काही चित्रपट, भूमिका व गाणी कधीही जुनी होत नाहीत. त्यांची लोकप्रियता कायम टिकून राहते. अशाच गाण्यांपैकी एक म्हणजे, “गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण…” हे गाणे आहे. आता हे गाणे नव्या रूपात प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे. झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत हे गाणे वेगळ्या रूपात ऐकायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘झी मराठी’ वाहिनीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये लाखात एक आमचा दादा या मालिकेतील एक गाणे पाहायला मिळत आहे. सूर्याच्या चार बहिणी त्याच्याकडे, “गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा आम्हाला तुळजावहिनी आण” , अशी आर्जवे करीत असल्याचे मिळत आहे. मात्र, या गाण्यात मालिकेचा संदर्भ घेत बदल करण्यात आल्याचे दिसत आहे. सूर्याच्या चार बहिणी हे गाणे म्हणत असताना तुळजा आणि सूर्याचे मालिकेतील आधीचे काही व्हिडीओ दाखविण्यात आले आहेत.

“गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा आम्हाला तुळजावहिनी आण”

या गाण्याचे बोल असे आहेत, “गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा आम्हाला तुळज वहिनी आण. डॉक्टर, आमच्या वहिनीची आम्ही घेऊ काळजी, तिच्यासमोर तुझी चालणार नाही मर्जी, तिच्या शब्दांचा आम्ही ठेवणार हो मान, दादा आम्हाला तुळजावहिनी आण. वहिनीला आणायला दादाची गाडी, दादाच्या गाडीलाकाजू-पुड्याची जोडी, दादा आणि वहिनी कसे दिसती छान छान, दादा आम्हाला तुळजावहिनी आण.” नेटकऱ्यांनादेखील हे गाणे आवडत असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

झी मराठी वाहिनी इन्स्टाग्राम

मालिकेत दाखविल्याप्रमाणे डॅडींनी तुळजाचे लग्न सत्यजितबरोबर ठरवले आहे. मात्र, डॉक्टर असलेल्या त्याच्याबरोबर लग्न करायचे नाही. मात्र डॅडींसमोर ती काहीच बोलू शकत नाही, कारण- त्यांना त्यांचा मान, समाजात असलेली प्रतिष्ठा फार महत्त्वाची आहे. तुळजाला तिचा बॉयफ्रेंड सिद्धार्थबरोबर लग्न करायचे. आता ठरलेले लग्न मोडून तिला त्याच्याबरोबर लग्न करायचे आहे आणि त्यासाठी ती तिचा लहानपणीचा मित्र सूर्याची मदत मागते. सूर्याचे तुळजावर प्रेम आहे तरीही ती आनंदी राहावी यासाठी तो तिला हे लग्न मोडण्यासाठी मदतही करतो. मात्र, आतापर्यंत हे लग्न मोडले नसल्याचे दिसत आहे. आता तुळजाच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाल्याचे मालिकेत पाहायला मिळत आहे.

समोर आलेल्या प्रोमोमध्ये सिद्धार्थबरोबर लग्न करण्यासाठी लग्नाच्या दिवशीच तुळजा सूर्याच्या मदतीने लग्नघरातून पळून जाते. ती वेळेत मंडपात येत नसल्याचे त्याची चर्चा सुरू होते. डॅडी लोकांना समजावत असतात की, ती इतक्यात येईल, तेवढ्यात सत्यजित त्यांना ती सूर्याबरोबर गाडीवरून गेल्याचा व्हिडीओ दाखवतो. त्यानंतर सूर्या आणि तुळजा परत आलेले दिसत आहेत. शिक्षा म्हणून डॅडी तुळजा आणि सूर्याला जबरदस्तीने लग्न करायला लावतात आणि इथून पुढे तुळजाबरोबरचा संबंध संपल्याचे जाहीर करतात, असे समोर आलेल्या प्रोमोमधून दिसत आहे.

हेही वाचा: विशाखा सुभेदारचा मुलगा पुढील शिक्षणासाठी निघाला परदेशात, भावुक होत म्हणाली, “आज आमचा अबू…”

आता तुळजा आणि सूर्याचे लग्न कोणत्या परिस्थितीत होणार, सिद्धार्थबरोबर तिने का लग्न केले नाही हे येत्या काही एपिसोडमधून पाहायला मिळणार आहे. तुळजा सूर्याबरोबर होणाऱ्या लग्नाचा स्वीकार करणार का आणि त्यांची मैत्री त्यानंतरही टिकणार का हे पाहणेदेखील प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lakhat ek aamcha dada sister different way to request surya sung old song with new version video nsp