छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार हे कायमच चर्चेत असतात. या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर लवकरच मराठी चित्रपटात झळकणार आहे. ‘फुलराणी’ असे तिच्या चित्रपटाचे नाव आहे. यानिमित्ताने अभिनेत्री शिवाली परबने तिच्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवाली परब ही सोशल मीडियावर सक्रीय असते. नुकतंच शिवालीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत ती आणि प्रियदर्शनी ‘फुलराणी’ चित्रपटाचा एक प्रसिद्ध डायलॉग बोलताना दिसत आहे. याला शिवालीने हटके कॅप्शनही दिले आहे.
आणखी वाचा : “मला ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रे’साठी नाकारण्यात आलं होतं” प्रियदर्शनीचा खुलासा, म्हणाली “तेव्हा सचिन सरांनी…”

शिवाली परबची पोस्ट

“फॉर बीवाली.

कुठून सुरवात करू समजत नाही आहे … चार वर्ष एकत्र काम करतोय, खूप जवळुन प्रवास पाहिला आहे तुझा, ही पोस्ट तुझ्या कौतुकासाठी करावी वाटतेय, खूप कौतुक खूप प्रेम खूप शुभेच्छा, ही तर फक्त सुरुवात आहे.

कोलीवाड्याची थ्री टाईम ब्युटीक्वीन ‘फुलराणी’ येतेय फक्त ३ दिवसात, २२ मार्चपासून जवळच्या चित्रपटगृहात!!” असे शिवालीने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

शिवालीच्या या पोस्टवर प्रियदर्शनी इंदलकरनेही प्रतिक्रिया दिली आहे. “प्रिय शिवाली, इतक्या उत्साहाने माझ्याकडून रिल करुन घेतलीस! तिथेच प्रेम कळतंय तुझं! प्रचंड थँक्यू! तुझ्याकडून बऱ्याच गोष्टी नकळत शिकतेय! असंच एकमेकींकडून शिकत राहू! आय लव्ह यू!” अशी कमेंट प्रियदर्शनीने या पोस्टवर केली आहे.

प्रियदर्शनी इंदलकरची कमेंट

आणखी वाचा : “मी प्रियदर्शनीला ओळखत नव्हतो, ती हास्यजत्रेत…” सुबोध भावेचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत

दरम्यान ‘फुलराणी’ हा चित्रपट येत्या २२ मार्चला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात सुबोध भावे विक्रम ही भूमिका साकारताना दिसणार आहे. तर सुशांत शेलार सौरभ ही व्यक्तिरेखा साकारत आहे. सध्या या चित्रपटाची ट्रेलर, गाणी सुपरहिट झाली आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fame actress shivali parab share special post for priyadarshani indalkar movie nrp