‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील कलाकार आज यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत. या कार्यक्रमातील विनोदी कलाकारांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली. इतकंच नव्हे तर त्यांचा चाहतावर्गही मोठा आहे. त्यातीलच एक कलाकार म्हणजे वनिता खरात. वनिताने नाटकांपासून तिच्या अभिनयक्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. मेहनतीच्या जोरावर तिने बॉलिवूडपर्यंत मजल मारली. पण तिचं राहणीमान अगदी सामान्य लोकांप्रमाणेच आहे.
आपल्या आवडत्या कलाकारांचं लाइफस्टाइल, त्यांचं घर कसं आहे अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यात चाहत्यांना अधिक रस असतो. काही कलाकार आपल्या खासगी आयुष्याबाबत खुलेपणाने व्यक्त होताना दिसत नाहीत. पण वनिताला याला अपवाद आहे. ती तिच्या लाइफस्टाइलबाबतही खुलेपणाने व्यक्त होते. आताही तिने तिच्या गावच्या घराचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.
आणखी वाचा – “लोकांना असं वाटतं की, आमच्याकडे खूप पैसे आहेत पण…” वनिता खरातचा खुलासा, म्हणाली, “माझे आई-वडील अजूनही…”
वनिता अगदी सामान्य कुटुंबामधून नावारुपाला आलेली कलाकार आहे. मुंबईमध्येही तिचं चाळीत घर आहे. आता तिने तिच्या गावच्या घराची झलक दाखवली आहे. वनिताचं देवगड हे गाव आहे. कोकणातलं तिचं हे घर निर्सगाच्या सानिध्यात आहे. तसेच अगदी कौलारु घर विशेष लक्ष वेधून घेणारं आहे. घरासमोर मोठ अंगणही आहे.
आणखी वाचा – दोन विवाहित अभिनेत्यांबरोबर होतं श्रीदेवी यांचं अफेअर, दोघांच्याही पत्नींना कळलं अन्…
वनिताने गावच्या घराचा फोटो शेअर करत म्हटलं की, “गावचं घर. हॅशटॅग देवगड”. वनिताचं अगदी सुंदर असं घर आहे. शिवाय वनिताने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. वनिताच्या लग्नाला चार महिने पूर्ण झाले आहेत. याचनिमित्त तिने पती सुमित लोंढेबरोबर एक सुंदर फोटो शेअर करत त्याच्यावर असणारं प्रेम व्यक्त केलं.