‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘माझा होशील ना’ मालिका चांगलीच गाजली. या मालिकेतील आदित्य व सई म्हणजेच विराजस कुलकर्णी व गौतमी देशपांडेची जोडी प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली होती. त्यामुळे मालिका संपल्यापासून प्रेक्षक ही जोडी पुन्हा कधी भेटीस येणार? याकडे डोळे लावून बसले होते. आता ही लोकप्रिय जोडी प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. पण यावेळेला मालिका नव्हे तर नाटकात विराजस व गौतमी झळकणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “…म्हणून मी ‘अबोली’ मालिका स्वीकारली” अभिनेता सुयश टिळकने सांगितलं कारण, म्हणाला…

चिन्मय मांडलेकर लिखित-दिग्दर्शित ‘गालिब’ या नाटकातून विराजस कुलकर्णी व गौतमी देशपांडे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. ५ नोव्हेंबरला हे नवकोरं नाटक रंगभूमीवर येणार आहे. त्यामुळे आता पुन्हा विराजस व गौतमीला एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षकांमधील उत्सुकता वाढली आहे.

हेही वाचा – ‘अबोली’ मालिकेत नुकतीच एंट्री झालेल्या सुयश टिळकने सांगितला नऊवारी साडी नेसण्याचा अनुभव; म्हणाला, “स्त्रिया…”

अष्टविनायक प्रकाशित, मल्हार+वज्रेश्वरी निर्मित ‘गालिब’ नाटकात विराजस व गौतमीबरोबर अश्विनी जोशी, गुरुराज अवधानी महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या नाटकाचं नेपथ्य, प्रकाशयोजनेची जबाबदारी प्रदीप मुळ्ये सांभाळत असून संगीत राहुल रानडे यांनी दिलं आहे. तर वेशभूषेची धुरा मंगल केंकरे सांभाळणार आहेत. या नाटकाचा शुभारंभाचा पहिला प्रयोग ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये रंगणार आहे.

हेही वाचा – Video: कुशल बद्रिकेने सोनाली कुलकर्णीवर केला विनोद अन् एकच हशा पिकला; पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: रोनाल्डोने सलमान खानकडे केलं दुर्लक्ष, नेटकरी म्हणाले, “आता याचं करिअर…”

दरम्यान, ‘गालिब’ या नाटकाची अनाउंसमेंट अभिनेते सचिन खेडेकर यांनी दिली आहे. याबाबत स्वतः चिन्मय मांडलेकरने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. ज्यामधून चिन्मयने सचिन खेडेकर यांचे आभार मानले होते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Majha hoshil na fame virajas kulkarni and gautami deshpande will appear in the new marathi drama ghalib pps