अभिनेते अविनाश नारकर यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही क्षेत्रात वैविध्यपूर्ण भूमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यांनी आता पन्नाशी जरी ओलांडली असली तरी त्यांचं फिटनेस आणि एनर्जी वाखण्याजोगी आहे. आजच्या तरुणांना लाजवेल असं त्यांचं फिटनेस आणि एनर्जी आहे. सध्या अविनाश नारकरांच्या एका डायलॉगने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – Video: “मोदीजी, मला चीन किंवा पाकिस्तानमध्ये पाठवा…” राखी सावंत सैनिकांचा गणवेश परिधान करून उतरली रस्त्यावर, व्हिडीओ व्हायरल

अभिनेते अविनाश नारकर सध्या ‘सन मराठी’वरील ‘कन्यादान’ आणि ‘झी मराठी’वरील ‘३६ गुणी जोडी’ या मालिकेत पाहायला मिळत आहेत. या दोन्ही मालिकांमध्ये त्यांनी वडिलांची भूमिका साकारली आहे. सध्या त्यांचा ‘३६ गुणी जोडी’ या मालिकेतील व्हिडीओ व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये अविनाश नारकर पालक आणि मुलांच्या संवादाविषयी बोलत आहेत.

हेही वाचा – अभिनेते मकरंद अनासपुरे यांचं शिक्षण किती झालंय माहितीये? जाणून घ्या…

या व्हिडीओत अविनाश नारकर म्हणतायत, “ज्या घरात संवाद असतो, मुलांमध्ये आणि पालकांमध्ये. त्या घरातली मुलं आपल्या मर्यादा आखून घेतात. ज्या घरातला संवादच तुटतो ते घर सुद्धा हळूहळू तुटायला लागतं. म्हणूनच अमुल्या तुझ्याकडून चूक झालेली असली, जरी ती अक्षम्य झालेली असली तरी आपल्यातला संवाद तुटू नये, असं मला नेहमी मनापासून वाटतं.”

हेही वाचा – “…म्हणूनच तुम्ही सिनेसृष्टीमधून बाहेर झालात”; नेटकऱ्याच्या प्रतिक्रियेवर ऐश्वर्या नारकरांचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या, “घरी या…”

हेही वाचा – Video: ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीचा चिमुकला लेक लाटतोय पोळ्या; पाहा व्हिडीओ

दरम्यान, अविनाश नारकर सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. ऐश्वर्या नारकर यांच्याबरोबरचे नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. कधी योगा तर कधी ट्रेंडिंग गाण्यावर डान्स करताना ते दिसतात. पण गेल्या काही दिवसांपासून ते ट्रोल होताना अधिक दिसत आहेत. मात्र या ट्रोलर्सना देखील ते सडेतोड उत्तर देताना पाहायला मिळत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor avinash narkar this dialogue goes viral pps