अभिनेता संदीप पाठक हा नेहमी काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर त्याने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांच्या माध्यमातून स्वतःची एक वेगळी छाप उमटवणारा अभिनेता म्हणून त्याला ओळखले जाते. नुकतंच संदीपने मराठी भाषेबद्दल एक ट्वीट केले आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संदीप हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. काही दिवसांपूर्वीच संदीपने मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत एक कविता सादर केली होती. त्यानंतर आता संदीपने मराठी भाषेबद्दल एक ट्वीट केले आहे. त्यात त्याने त्याच्या लेकीचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात त्याची मुलगी स्वरा ही एवढा मोठा भोपळा ही कविता बोलताना दिसत आहे.
आणखी वाचा : “मला आज एका मुलाखतीत नकार देण्यात आला कारण…” संदीप पाठकचा व्हिडीओ व्हायरल

संदीप पाठकने सलग दोन ट्वीट केले आहे. यात त्याने “आज माझ्या मुलीने “स्वरा” ने “एवढा मोठा भोपळा” ही मराठी कविता म्हटली. खूप छान वाटलं. आपण आपल्या येणाऱ्या नवीन पिढीला जर मराठी गाणी, कविता, नाटक, चित्रपट, मराठी गोष्टीची पुस्तकं वाचायला दिली आणि घरात मुलांसोबत मराठीतून संवाद साधला तर नक्कीच मराठी भाषा टिकेल, वाढेल आणि जगेल”, असे पहिल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

त्यानंतर संदीपने आणखी एक ट्वीट केले आहे. “अश्या पध्दतीने आपण ३६५ दिवस मराठी भाषादिवस साजरा केला पाहिजे. “मराठीत बोलूया महाराष्ट्राचा अभिमान बाळगूया” असे संदीप पाठकने ट्वीट करत म्हटले आहे.

आणखी वाचा : “पहिलं आणि शेवटचं…” शिव ठाकरेबद्दल विचारताच संतापलेली वीणा जगताप

दरम्यान संदीप पाठकने आतापर्यंत श्वास, एक डाव धोबीपछाड, हरिश्चंद्राची फॅक्टरी, शहाणपण देगा देवा, एक हजाराची नोट, येड्याची जत्रा, देऊळ बंद, डबल सीट, नटसम्राट, बेनवाड, ईडक, राख अशा अनेक चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. वऱ्हाड निघालंय लंडनला या नाटकाने त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. काही दिवसांपूर्वी तो श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वे यांची मुख्य भूमिका असलेल्या आपडी थापडी या चित्रपटात झळकला होता.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor sandeep pathak tweet about marathi language speaking nrp