अभिनेता संदीप पाठक हा नेहमी काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर त्याने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. संदीपने आतापर्यंत अनेक विविध भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे सिनेसृष्टीत त्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांच्या माध्यमातून स्वतःची एक वेगळी छाप उमटवणारा अभिनेता म्हणून त्याला ओळखले जाते. पण सिनेसृष्टीत एक उत्कृष्ट अभिनेता होण्यासाठी त्याला अथक मेहनत घ्यावी लागली. नुकतंच संदीपने एका व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

संदीप पाठकने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात संदीप त्याला एका मुलाखतीत नकार मिळाल्याचे सांगताना दिसत आहे. यावेळी त्याने एक रिल व्हिडीओ शेअर केला आहे. यात तो म्हणतो की “मला आज एका मुलाखतीत नकार देण्यात आला.”

canada student visa (1)
कॅनडाच्या ‘त्या’ निर्णयाने भारतीय विद्यार्थी अडचणीत, स्टडी व्हिसाऐवजी व्हिजिटर व्हिसावर कॅनडाला जाण्याच्या प्रयत्नात; कारण काय?
IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: डगआऊटमधून रिव्ह्यूसाठी सूचना; टीम डेव्हिडचं ‘ब्रेनफेड मोमेंट’, पाहा VIDEO
RBI repo rate announcement Shaktikanta Das
आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे ठेवण्याचे कारण काय? जाणून घ्या
Love Jihad
व्हायरल होत असलेला लव्ह जिहादचा तो व्हिडीओ…

त्यावर मला त्यांनी कारण सांगताना म्हटलेली की “तू फार सुंदर आहेस. जर तू आमच्याकडे नोकरी केलीस तर आमच्याकडील मुली कामावर लक्ष देणार नाहीत.” यानंतर संदीप रुमाल घेऊन रडताना दिसत आहे. संदीपने शेअर केलेला हा व्हिडीओ मजेशीर रिल प्रकारातील आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

दरम्यान संदीप पाठकने आतापर्यंत श्वास, एक डाव धोबीपछाड, हरिश्चंद्राची फॅक्टरी, शहाणपण देगा देवा, एक हजाराची नोट, येड्याची जत्रा, देऊळ बंद, डबल सीट, नटसम्राट, बेनवाड, ईडक, राख अशा अनेक चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. वऱ्हाड निघालंय लंडनला या नाटकाने त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. दरम्यान काही दिवसांपूर्वी तो श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वे यांची मुख्य भूमिका असलेल्या आपडी थापडी या चित्रपटात झळकला होता.