Marathi Actress : अलीकडच्या काळात बरेच मराठी कलाकार बॉलीवूड स्टार्सबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसतात. महेश मांजरेकर, प्रिया बापट, सई ताम्हणकर, अनघा अतुल, अमृता खानविलकर, गश्मीर महाजनी, सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर या कलाकारांनी मराठीसह हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. आता या लोकप्रिय कलाकारांपाठोपाठ आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीला बॉलीवूड अभिनेत्यासह झळकण्याची संधी मिळाली आहे. या अभिनेत्रीने अभिषेक बच्चनसह एका जाहिरातीत स्क्रीन शेअर केली आहे. ही अभिनेत्री कोण आहे जाणून घेऊयात…

टेलिव्हिजनवरील मालिकांमध्ये नायिकेप्रमाणे खलनायिका सुद्धा तेवढीच महत्त्वाची असते. अनेकदा खलनायिकांची पात्र जास्त लोकप्रिय ठरतात आणि प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतात. ‘तू तेव्हा तशी’, ‘खुलता कळी खुलेना’, ‘तुला पाहते रे’, ‘रंग माझा वेगळा’ अशा गाजलेल्या मालिकांमध्ये काम करून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे अभिज्ञा भावे. बहुतांश मालिकांमध्ये अभिज्ञा आपल्याला खलनायिकेच्या भूमिकेत दिसते. प्रेक्षकांची ही लाडकी अभिनेत्री नुकतीच बॉलीवूड स्टार अभिषेक बच्चनबरोबर एका जाहिरातीत झळकली आहे. हा व्हिडीओ अभिषेकने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

हेही वाचा : Video : कार्तिक आर्यनला दहा वर्षानंतर मिळाली इंजिनिअरिंगची पदवी; व्हिडीओ शेअर करत अभिनेता म्हणाला, “बॅकबेंचरपासून ते…”

जाहिरात सुरू झाल्यावर सुरुवातीलाच प्रेक्षकांना अभिज्ञाची झलक यात पाहायला मिळत आहे. कपड्यांच्या ब्रँडसाठी या दोघांनी एकत्र काम केलं आहे. अभिषेक या जाहिरातीत साऊथ इंडियन लूकमध्ये, तर अभिज्ञा वेस्टर्न लूकमध्ये पाहायला मिळत आहे. या क्लोथिंग ब्रँडसाठी अभिषेक बच्चन ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून काम करणार आहे. ही जाहिरात आता सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. या मोठ्या संधीसाठी मराठी कलाविश्वातून अभिज्ञावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. याशिवाय अनेक कलाकारांनी ही जाहीरात स्टोरीवर शेअर करत अभिज्ञाचं कौतुक करत पोस्ट शेअर केल्या आहेत.

हेही वाचा : “तुम्ही South च्या बाहुबलीचं कौतुक असेल तर…”, सुबोध भावेचा ‘संगीत मानापमान’ पाहून मराठी अभिनेत्री भारावली, प्रेक्षकांना म्हणाली…

अभिज्ञा भावे अभिषेक बच्चनसह झळकली ( Marathi Actress )

दरम्यान, अभिज्ञा भावेच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत तिने तनुजा भारद्वाज ही व्यक्तिरेखा साकारली होती. याशिवाय गेल्यावर्षी अभिज्ञा हिंदी मालिका ‘बातें कुछ अनकही सी’मध्ये झळकली होती. या मालिकेने २०२४ च्या मार्च महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेतला. अभिज्ञा नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते.