रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाची सध्या चहूबाजूने चर्चा सुरू आहे. वीर सावरकरांच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट २२ मार्चला प्रदर्शित झाला. तेव्हापासून या चित्रपटाविषयी कलाकार मंडळी सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त करत आहे. सर्वजण रणदीप हुड्डाचं कौतुक करत आहे. अशातच एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने एक वक्तव्य करत रणदीपचे आभार व्यक्त केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटात वीर सावरकरांची भूमिका अभिनेता रणदीप हुड्डाने साकारली आहे. तर अभिनेत्री अंकिता लोखंडे वीर सावरकरांच्या पत्नीच्या भूमिकेत झळकली आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असून कौतुकाचा वर्षावर होतं आहे.

हेही वाचा – दिया मिर्झाच्या आगामी प्रोजेक्टमध्ये मराठी कलाकारांची वर्णी, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्यासह झळकणार ‘ही’ अभिनेत्री

अभिनेत्री गौतमी देशपांडेने नुकतंच इन्स्टाग्राम स्टोरीवर ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाविषयी पोस्ट शेअर केली आहे. चित्रपटाचा पोस्टर शेअर करत गौतमीने लिहिलं आहे, “कृपया हा चित्रपट तुम्ही पाहा. जेव्हा लोक टाळ्या वाजवतात आणि नारा देतात की, ‘वीर सावरकर की जय’ तेव्हा अंगावर शहारे येतात. गेले कित्येक महिने मी चित्रपटाची वाट पाहत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर या देशाला अजून १०० वर्ष हवे होते. धन्यवाद रणदीप हुड्डा तुम्ही चित्रपट केलात. कृतज्ञ आहे.”

पुढे गौतमीने लिहिलं, “मला या चित्रपटाचं तिकिट मिळत नव्हतं, याचा मला खूप आनंद झाला. हा चित्रपट हाऊसफूल झाला आहे. ही आतापर्यंतची सर्वात्तम भावना आहे.”

दरम्यान, गौतमीच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तिने ‘सारे तुझ्याचसाठी’ मालिकेतून मनोरंजन क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यानंतर गौतमी ‘माझा होशील ना’ या मालिकेत झळकली. तिची ही मालिका चांगलीच गाजली होती. सध्या ती ‘गालिब’ या नाटकात काम करत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress gautami deshpande reaction on randeep hooda swatantraveer savarkar movie pps