मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ चांदेकरला ओळखले जाते. सिद्धार्थ चांदेकरची पत्नी आणि अभिनेत्री मिताली मयेकर ही कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी मितालीने आठ लीटर ताक ऑर्डर केले होते. त्यानंतर आता मितालीच्या एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यावर एका नेटकऱ्याने भन्नाट कमेंट केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिताली मयेकर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने केस मोकळे सोडून फोटोशूट केलं आहे. या फोटोला तिने हटके कॅप्शनही दिले आहे.
आणखी वाचा : शिव ठाकरे-वीणा जगतापचं पुन्हा पॅचअप? ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

“मी माझे केस देखील नीट मॅनेज करू शकत नाही, तर मग मी माझं आयुष्य कसं मॅनेज करू?”, असं कॅप्शन मितालीनं दिले आहे. बेसिक लाइफ प्रॉब्लेम असा हॅशटॅगही मितालीनं यावेळी शेअर केला आहे. तिच्या नवऱ्याने म्हणजे सिद्धार्थने हा फोटो काढला आहे.

तिच्या या फोटोवर एकाने ‘ही सर्व कमाल ताक पिण्याची आहे’, अशी कमेंट केली आहे. त्यावर मितालीने ‘कृपया मला एकटीला राहू द्या’, असा रिप्लाय दिला आहे. मितालीच्या या रिप्लायवर त्याने ‘धन्यवाद’ अशी कमेंट केली आहे.

आणखी वाचा : “‘बाई, बूब्स आणि ब्रा’ पोस्टनंतर मला एका लग्न झालेल्या पुरुषाने फोन केला अन्…” हेमांगी कवीने सांगितला ‘तो’ किस्सा

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून तापमान प्रचंड वाढल्याने उन्हाच्या झळा बसत आहेत. अशातच उन्हाळ्यात शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी ताक, लस्सी, कोकम सरबत अशा शीत पेयांचा आधार घेतला जातो. पण मितालीनेही शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी तब्बल आठ लीटर ताक ऑर्डर केलं. याचा व्हिडीओ सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला होता.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress mitali mayekar share instagram post netizens comment buttermilk nrp