Rutuja Bagwe Father Birthday Celebration : मराठी नाटक, मालिका व चित्रपट अशा तीनही माध्यमांतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे. झी मराठीवरील ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेमुळे ऋतुजा लोकप्रिय झाली. आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी ऋतुजा सोशल मीडियावरदेखील चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर आपले अनेक स्टायलिश फोटो व अनेक ट्रेंडिंग व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.

अशातच ऋतुजाने सोशल मीडियावर वडिलांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ऋतुजाच्या वडिलांचा ७०वा वाढदिवस अभिनेत्रीनं तिच्या स्वत:च्या रेस्टॉरंटमध्ये जल्लोषात साजरा केला आणि या सेलिब्रेशनची खास झलक ऋतुजानं सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे.

ऋतुजानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तिने आणि तिच्या बहिणीने मिळून कणकेचे दिवे केले. या दिव्यांनी ऋतुजा आणि तिच्या बहिणीनं वडिलांचं औक्षणही केलं. वडिलांच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीनं रेस्टॉरंटमध्ये खास सजावटही केली होती. रेस्टॉरंटमधील इतर सहकाऱ्यांबरोबर ऋतुजानं बाबांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं. ‘बाबा’ अशी कॅप्शन देत ऋतुजानं हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

ऋतुजाने शेअर केलेल्या या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे. तसंच या व्हिडीओखालील कमेंट्समध्ये ऋतुजाच्या चाहत्यांनी तिच्या बाबांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच क्रांती रेडकर, मयूरी देशमुख, निखिल बने, वर्षा दांदळे, गौरी कुलकर्णी, रोहन गुजरसह अनेक कलाकार मंडळींनीसुद्धा व्हिडीओखालील कमेंट्समध्ये ऋतुजाच्या वडिलांना शुभेच्छा दिल्या आहेत.

ऋतुजा बागवेने स्वत:च्या रेस्टॉरंटमध्ये साजरा केला वडिलांचा वाढदिवस

ऋतुजाच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास, तिनं मराठीसह हिंदी मालिकांमधूनही प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ‘चंद्र आहे साक्षीला’, ‘नांदा सौख्य भरे’, ‘तू माझा सांगाती’ यांसारख्या मराठी मालिकांमधून तिनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे; तर ती ‘माटी से बंधी डोर’ या हिंदी मालिकेत मुख्य भूमिकेत होती. यासह ऋतुजा काही मराठी सिनेमांतूनही प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

दरम्यान, अभिनेत्री म्हणून ओळख मिळवल्यानंतर ऋतुजाने ‘बिझनेस वुमन’ म्हणून आपला एक नवा प्रवास सुरू केला आहे. तिनं अंधेरी पूर्व परिसरात स्वत:चं नवीन रेस्टॉरंट सुरू केलं आहे. ऋतुजाच्या या रेस्टॉरंटचं नाव ‘फूडचं पाऊल’ असं आहे. याच रेस्टॉरंटमध्ये तिने वडिलांच्या ७०व्या वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन केलं आहे.