मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर ही सतत काही ना काही कारणांनी चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच सईने नवीन घर खरेदी केले आहे. त्याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो तिने शेअर केले आहेत. त्यातच आता सईने तिला तिच्या नवीन घरात कसं वाटत आहे, याबद्दल सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सई ताम्हणकर ही मूळची सांगलीची आहे. पण काही महिन्यांपूर्वीच सईने मुंबईत नवीन घर घेतल्याचे सांगितले. त्यामुळे ती खऱ्या अर्थाने मुंबईकर झाली. काही दिवसांपूर्वीच सई ताम्हणकरने तिच्या युट्यूबवर नवीन आणि जुन्या घराचे व्हिडीओ शेअर केले होते. त्यात तिने नवीन घराच्या काही झलकही दाखवल्या होत्या.
आणखी वाचा : सई ताम्हणकरने तिचं नवीन घर कसं शोधलं? म्हणाली “मला लॉकडाऊनमध्ये…”

आता सईने इन्स्टाग्रामवर आस्क मी समथिंग हे सेशन घेतले. या वेळी तिला तिच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. यावेळी एकाने सईला “नवीन घर कसं वाटत आहे?” याबद्दल विचारणा केली. त्यावर सईने तिच्या नव्या घरातील फोटो शेअर करत उत्तर दिले. तिने “नवीन घरात खूप भारी वाटत आहे”, असे सांगितले.

सई ताम्हणकरची कमेंट

आणखी वाचा : “तुझा आवडता हॉलिवूड किंवा बॉलिवूड अभिनेता कोण?” प्रार्थना बेहेरे म्हणाली “त्या अभिनेत्याने…”

दरम्यान सई तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी २००५ मध्ये मुंबईत आली. सांगलीत तिचं संपूर्ण बालपण गेलं. तेव्हापासून सई आई-बाबांच्या, नातेवाईकांच्या आणि भाड्याच्या अशा एकूण १० घरांमध्ये राहिली. त्यामुळे नव्या घराला अभिनेत्रीने ‘माय इलेव्हन्थ प्लेस’ असं नाव दिलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress sai tamhankar fan ask about her new home share photo and comment nrp