Marathi Actress Dance Video : दहीहंडीनिमित्त राज्यभरात उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण आहे. ठिकठिकाणी दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. या दहीहंडीच्या कार्यक्रमांना ठिकठिकाणी कलाविश्वातील कलाकार मंडळींनी उपस्थिती लावली आहे.

अनेक कलाकारांनी आपल्या सोशल मीडियाद्वारे फोटो-व्हिडीओ पोस्ट करत दहीहंडी आणि श्रीकृष्णजन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच लोकप्रिय मराठी अभिनेत्रींनी श्रीकृष्णजन्माष्टमी आणि दहीहंडीनिमित्त सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे.

झी मराठीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या लोकप्रिय मालिकेतील लीला आणि रेवती म्हणजेच अभिनेत्री वल्लरी विराज आणि आलापिनी निसळ यांनी श्रीकृष्णाच्या गाण्यावर सुंदर नृत्य सादरीकरण केलं आहे. या नृत्य सादरीकरणाचा व्हिडीओ त्यांनी आपल्या सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे.

‘शुभमंगल सावधान’ या हिंदी सिनेमातील ‘कान्हा’ या गाण्यावर वल्लरी आणि आलापिनी यांनी सुंदर असं नृत्य सादर केलं आहे. या सादरीकरणातील दोघींच्या गण्याच्या प्रत्येक ओळीतले भाव चाहत्यांपर्यंत अगदी योग्य पद्धतीने पोहोचवताना दिसत आहेत. तशा प्रतिक्रियासुद्धा चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत.

केवळ चाहतेच नव्हे तर अनेक कलाकारांनासुद्धा वल्लरी-आलापिनी यांचं ‘कान्हा’वरील नृत्य सादरीकरण आवडलं आहे. “तुम्ही दरवेळी आम्हाला नव्याने तुमच्या प्रेमात पाडता…”, “किती गोड”, “खूपच छान”, “तुम्ही दोघी किती भारी आहात”, “प्रत्येक व्हिडिओ किमान तीन वेळा बघावा लागतो” या आणि अशा अनेक प्रतिक्रिया व्यक्त करत चाहत्यांनी दोघींचं कौतुक केलं आहे.

वल्लरी आणि आलापिनी या सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. दोघी एकमेकींच्या खूपच खास मैत्रीणी आहेत. त्या अनेकदा त्यांचे एकत्र फोटो शेअर करत असतात. त्याचबरोबर एकत्र नृत्याचे व्हिडीओही शेअर करताना दिसतात. वल्लरी-आलापिनी या दोघींना नृत्याची आवड आहे. नृत्याचे अनेक व्हिडीओ शेअर करत त्या आपली आवड जपताना दिसतात. अशातच त्यांचा नवा व्हिडीओ सर्वांच्या पसंतीस उतरत आहे.

वल्लरी-आलापिनी ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत एकत्र होत्या. मालिकेत दोघी एकमेकींच्या बहिणी होत्या. ऑनस्क्रीन असलेला त्यांचा हा बॉण्ड ऑफस्क्रीन सुद्धा आहे. दरम्यान, यावर्षी मार्च महिन्यात या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिका संपली असली तरी, दोघी सोशल मीडियाद्वारे नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहतात.