‘मास्टरशेफ ऑफ इंडिया’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी शो आहे. इतर पर्वांप्रमाणेच ‘मास्टरशेफ ऑफ इंडिया’चं सातवं पर्वही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. नवीन पर्वाला सुरुवात झाल्यापासून हा शो चर्चेत आहे. अंतिम टप्प्यात असलेल्या या ‘मास्टरशेफ’ शोला नेटकऱ्यांनी पुन्हा ट्रोल केलं आहे. ‘मास्टरशेफ’च्या परिक्षकांवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘मास्टरशेफ ऑफ इंडिया’च्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागामुळे हा शो पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. या शोमध्ये नुकतंच मुंबईच्या डबेवाल्यांनी हजेरी लावली होती. शोमधील स्पर्धकांना डबेवाल्यांसाठी पदार्थांची मेजवानी बनवण्याचा टास्क देण्यात आला होता. यासाठी निळ्या व लाल रंगाच्या टीममध्ये स्पर्धकांची विभागणी करण्यात आली होती. लाल टीममधील स्पर्धक अरुणाने फिल्टर कॉफी श्रीखंड बनवलं होतं. परंतु, ही डिश यशस्वी झाली नाही. पहिल्यांदाच बनवलेली ही डिश अरुणाने चाखून न पाहता ताटात वाढली होती. या डिशबाबत परीक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरुन नेटकरी नाराज आहेत.

हेही वाचा>> घरातील ‘तो’ फोटो शेअर करत प्राजक्ता माळीची पोस्ट, म्हणाली “दोन कोपरे…”

नेटकऱ्यांनी ट्वीटरवर कमेंट करत ‘मास्टरशेफ ऑफ इंडिया’ला ट्रोल केलं आहे. या शोचे परीक्षक पक्षपात करत असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. “अरुणाला किती नम्रपणे सांगितलं…प्रियांकाला तिची चूक दाखवताना रणवीर बरारचा नम्रपणा कुठे असतो?”, असं एकाने म्हटलं आहे.

हेही वाचा>> ‘बाहुबली’ फेम अभिनेत्याला एका डोळ्याने दिसत नाही, किडनीही केली ट्रान्सप्लांट, म्हणाला “त्यांनी मृत्यूनंतर…”

“कमलदीप किती वेळापासून बाल्कनीमध्ये उभ्या असलेल्या दिसतात. टिकट टू फिनाले खूपच लवकर नाही झालं का?”

मास्टरशेफ शो सगळ्यात वाईट शो आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. या शोचे परिक्षक पक्षपात करतात.

अरुणाने बनवलेल्या डिशमध्ये जेठालाल इन्वेन्शन शोधताना

‘मास्टरशेफ ऑफ इंडिया ७’ अंतिम टप्प्यात आहे. लवकरच या शोचा विजेता घोषित होणार आहे. रणवीर बरार, विकास खन्ना व गरीमा या शोचे परीक्षक आहेत. महाअंतिम सोहळा होण्याआधीच या शोच्या विजेत्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mastaerchef of india show contestant aruna made filter coffee shrikhand netizens troll said ranveer brar is biased kak