Mrinal Kulkarni : अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांना मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडपं म्हणून ओळखलं जातं. त्या दोघांनी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ३ मे २०२२ रोजी लग्नगाठ बांधली. विराजस आणि शिवानी हे दोघेही त्याआधी कित्येक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. आज विराजस-शिवानी त्यांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यानिमित्ताने विराजसच्या आई व शिवानीच्या सासूबाई अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी खास पोस्ट लिहिली आहे.

मृणाल कुलकर्णींनी विराजस आणि शिवानीबरोबरचे खास फोटो शेअर करत त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यातील एका फोटोमध्ये शिवानी-विराजस समुद्रकिनारी बोटीवर बसून फोटोसाठी पोझ देत असल्याचं पाहायला मिळत आहे.

मृणाल कुलकर्णींची मुलगा व सुनेसाठी पोस्ट

प्रिय शिवानी आणि विराजस,
बघा!! ३ वर्षे झाली देखील…असाच काळ पटापट पुढे जातो बरं का! जे आवडतंय ते मनापासून, प्रामाणिकपणे करा पण, त्यातली मजा घ्यायला विसरू नका! Work And Life Balance Is The Most Important Thing… आम्हाला तुमचा अभिमान आहे, कौतुक आहे आणि शुभेच्छा तर आहेतच… समाधानी राहा… स्वत:बरोबर आजूबाजूच्या सर्वांना आनंदी ठेवा…यशस्वी व्हा!

मृणाल कुलकर्णींची सून व मुलासाठी पोस्ट ( Mrinal Kulkarni Post For Shivani And Virajas )

शिवानीने देखील नवऱ्यासाठी खास पोस्ट लिहित त्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ती लिहिते, “Happy Anniversary विराजस, खरंतर आज आपण वेगवेगळ्या शहरात आहोत पण, आपल्याला हवं ते आणि आवडीचं काम करतोय…आपण दोघंही शूटिंग सेटवर आपआपलं काम करतोय…आयुष्यात असेच एकत्र पुढे जाऊ.”

मृणाल कुलकर्णींनी शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी शिवानी-विराजससाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान, सध्या शिवानी रांगोळे ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत झळकत आहे. या मालिकेत शिवानी अक्षरा हे मुख्य पात्र साकारताना दिसत आहे. तर, विराजस सध्या रंगभूमीवर काम करत आहे. ‘फिल्टर कॉफी’ या नाटकात तो महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. तसेच ‘वरवरचे वधूवर’ या नाटकाचं लेखन-दिग्दर्शन देखील विराजसने केलं आहे.