Guatami Deshpande Birthday : मराठी इंडस्ट्रीत ‘देशपांडे सिस्टर्स’ची नेहमीच चर्चा असते. या दोन्ही बहि‍णींनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मृण्मयी आणि गौतमी देशपांडे या दोन्ही अभिनेत्री एकमेकींच्या सख्ख्या बहिणी आहेत. सोशल मीडियावर अनेकदा दोघीही एकमेकींचे मजेशीर, तर कधी भांडतानाचे भन्नाट व्हिडीओ शेअर करत असतात. यापैकी अभिनेत्री गौतमी देशपांडे आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. धाकट्या बहिणीच्या वाढदिवसानिमित्त मृण्मयीने खास पोस्ट शेअर करत बहिणीला शुभेच्छा दिल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘माझा होशील ना’ या मालिकेमुळे अभिनेत्री गौतमी देशपांडे घराघरांत लोकप्रिय झाली. आपली मोठी बहीण मृण्मयीच्या पावलावर पाऊल ठेवत गौतमीने कलाविश्वात पदार्पण केलं होतं. गौतमी देशपांडेवर वाढदिवसाच्या निमित्ताने आज मराठी कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. मृण्मयीने सुद्धा हटके पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

गौतमीसाठी मृण्मयीची खास पोस्ट

मृण्मली लिहिते, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रायोरिटी नंबर १… आय लव्ह यू… एक नंबरवर गौतू बाकी सगळे २ नंबर” यावर गौतमीने हसायचे इमोजी देऊन ‘थँक्स’ असा रिप्लाय दिला आहे.

तर, मृण्मयीचं हटके कॅप्शन वाचून नेटकऱ्यांनी या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “टॉम आणि जेरीची आज भांडणं नाहीत”, “नवऱ्यापेक्षा बहिणीला पहिली प्रायोरिटी म्हणणं हा जन्मसिद्ध हक्क आहे”, “आज न भांडता शुभेच्छा दिल्यात, किती सुंदर बॉण्डिंग” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या पोस्टवर दिल्या आहेत.

दरम्यान, मृण्मयी आणि गौतमी देशपांडे यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर मृण्मयी गेली अनेक वर्षे कलाविश्वात सक्रिय आहे. आजवर तिने अनेक मालिका व चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. आता लवकरच मृण्मयीचा ‘एक राधा एक मीरा’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

याशिवाय गौतमी देशपांडे मालिकेनंतर आता सध्या रंगभूमीवर सक्रियपणे काम करत आहे. ‘गालिब’नंतर ती २ वाजून २२ मिनिटांनी नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mrunmayi deshpande shares special post for sister gautami deshpande on the occasion of her birthday sva 00