मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांची जोडी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. साधं राहणीमान, उत्तम संस्कार यामुळे या जोडप्यावर नेटकरी कायम कौतुकाचा वर्षाव करत असतात. नुकताच मुग्धा-प्रथमेश लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा मोठ्या उत्साहाने साजरा केला. प्रेक्षकांची ही लाडकी जोडी गाण्यांच्या कार्यक्रमांसाठी नेहमीच विविध ठिकाणी दौऱ्यावर असते पण, या सगळ्यात वेळात वेळ काढून मुग्धा-प्रथमेश आपली कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना दिसतात. आज सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त मुग्धाने खास पोस्ट शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या पहिल्या पर्वामध्ये प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. तेव्हापासूनच त्यांची चांगली मैत्री आहे. या कार्यक्रमामुळेच त्या दोघांचे कुटुंबीय सुद्धा एकमेकांना ओळखू लागले होते. पुढे, मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन मुग्धा-प्रथमेशने गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात लग्नगाठ बांधली.

हेही वाचा : “बऱ्याच मागण्या असतात राव पोरींच्या”, हेमंत ढोमेच्या फोटोवर पत्नी क्षितीची भन्नाट कमेंट; म्हणाली…

प्रथमेशच्या आईच्या म्हणजेच मुग्धाने सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये गायिकेने “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नीना काकू” असं म्हटलं आहे. यानिमित्ताने मुग्धा प्रथमेशच्या आईला काकू अशी हाक मारतो हे तिच्या चाहत्यांना कळलं आहे.

हेही वाचा : “कुत्रे नॉनव्हेज खायचे, मला व्हेज खायला लागायचं”; अर्जुन रामपालनं सांगितली ‘त्या’ दिवसांमधील व्यथा

मुग्धा वैशंपायनने शेअर केलेली चर्चेत

दरम्यान, मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे यांनी २०२३ मध्ये लग्नगाठ बांधली. या दोघांच्या लग्नाला सिनेविश्वातील बरेच कलाकार उपस्थित होते.