Bigg Boss 17 Winner Munawar Faruqui : स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी ‘बिग बॉस १७’ चा विजेता ठरला आहे. ऑक्टोबरमध्ये सुरू झालेलं बिग बॉसचं १७ वं पर्व २८ जानेवारी रोजी संपलं. शोची ट्रॉपी मुनव्वर फारुकीने जिंकली तर अभिषेक कुमार उपविजेता ठरला. शो जिंकल्यानंतर मुनव्वरने ट्रॉफीबरोबरचा फोटो शेअर करत पोस्ट केली आहे.

मुनव्वर फारुकीने सलमान खानबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. त्यात सलमान व मुनव्वर ट्रॉफी पकडून पोज देत आहेत. “खूप खूप आभार जनता. तुमच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे ट्रॉफी अखेर डोंगरीला आलीच. मार्गदर्शनासाठी मोठे भाऊ सलमान खान यांने विशेष आभार,” असं त्याने कॅप्शन दिलं आहे.

Bigg Boss 17: पैसे कमावण्यासाठी विकले सामोसे, आईने केली आत्महत्या; असा होता ‘बिग बॉस १७’चा विजेता मुनव्वर फारुकीचा प्रवास

मुनव्वर फारुकीच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स व लाइक्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी त्याच्या या पोस्टवर कमेंट करून ट्रॉफी जिंकल्याबद्दल त्याचं अभिनंदन केलं आहे. मुनव्वर फारुकीने बिग बॉस १७ चा विजेता म्हणून ५० लाख रुपये आणि एक क्रेटा कार जिंकली आहे.

दरम्यान, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, मनारा चोप्रा, अंकिता लोखंडे व अरुण माशेट्टी हे बिग बॉस १७ मधील टॉप पाच स्पर्धक होते. सर्वात आधी अरुण घराबाहेर पडला, त्यानंतर अंकिता लोखंडे शर्यतीतून बाहेर झाली. मग मनारा चोप्रा बाहेर पडली. शेवटी अभिषेक व मुनव्वर हे टॉप स्पर्धक होते. त्यापैकी मुनव्वरने ट्रॉफी जिंकली.