Netizens On Shashank Ketkar New Look: अभिनेता शशांक केतकर हा लोकप्रिय अभिनेता आहे. सध्या तो ‘मुरांबा’ मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अक्षय ही भूमिका त्याने साकारली आहे. या मालिकेतील त्याच्या भूमिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसतात.
आता अभिनेता त्याच्या एका सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आला आहे. शशांक केतकरने त्याच्या सोशल मीडियावर त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. त्याने त्याचा लूक बदलला असल्याचे या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे. हे फोटो शेअर करताना त्याने लिहिले की नवीन हेअरकट ही थेरपी आहे. पुढे अभिनेत्याने चाहत्यांना उद्देशून लिहिले की मला हा नवीन लूक आवडला आहे. तुम्ही याबद्दल काय विचार करता?
नेटकरी काय म्हणाले?
अभिनेत्याच्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. नेटकऱ्यांनी शशांकचे मोठे कौतुक केले आहे. एका चाहत्याने लिहिले, “१० वर्ष मागे गेलास मित्रा, खूप छान,देखणा दिसतो आहेस. त्या सुंदर हेअरकटबरोबर, काळा शर्ट आणि तुझ्या चेहर्यावरील हसू आणि ती नवीन स्टाइलची चैन सांभाळतो आहेस. देखणा दिवा “, दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, “एक नंबर, खूप छान दिसत आहेस. मित्रा तू कुठल्याही लूकमध्ये भारीच दिसतोस. शब्दच सुचत नाहीये”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “कोणतीही स्टाइल कर, तू छानच दिसतोस”, एका नेटकऱ्याने लिहिले, “किती छान.शशांक तु कुठल्याही लूकमध्ये भारीच दिसतोस.”
काही नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्याचे पाहायला मिळत आहे. “एकदम भारी काम केलं. आता तुमचा कोणी केसाने गळा नाही कापणार”, “रमाच्या भाषेत टवका”, “मस्त. खुप छान दिसतोय आमचा श्री”, “श्रीची आठवण झाली एकदम”, “श्री परत आला आहे”, “वाह!एक नंबर”, “परफेक्ट”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
अभिनेता शशांक केतकरची ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील श्री ही भूमिका प्रचंड गाजली. पुढे त्याने विविध मालिका, वेब सीरीज मधून प्रेक्षकांच्या मनावर त्याने राज्य केले. आता त्याच्या ‘मुरांबा’ मालिकेतील त्याच्या भूमिकेलादेखील प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळताना दिसत आहे. या मालिकेतील अक्षय व रमाची जोडी प्रेक्षकांची लाडकी आहे.
© IE Online Media Services (P) Ltd