Muramba upcoming twist: टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या लाडक्या होतात. त्यामधील काही पात्रे ही त्यांना जवळची वाटतात. आपल्या आवडत्या पात्रांबरोबर काही वाईट होऊ नये, असे प्रेक्षकांना सतत वाटत असते.

तसेच, मालिकेत सतत येणारे ट्विस्ट प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. आता मुरांबा या मालिकेत असाच एक ट्विस्ट आल्याचे पाहायला मिळत आहे. इरावतीच्या कारस्थानामुळे रमा आणि अक्षय एकमेकांपासून दूर झाले होते.

सात वर्षांत त्यांच्या आयुष्यात अनेक बदल झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांची मुलगी आरोही मोठी झाली आहे. तिच्यामुळेच रमा आणि अक्षय पुन्हा एकदा एकमेकांच्या जवळ आल्याचे पाहायला मिळाले. आता इरावतीमुळे पुन्हा एकदा त्यांच्यात दुरावा येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

“त्याआधी मोठा खेळ मी खेळणार…”

स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर मुरांबा मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, रमा व इरावती यांच्यामध्ये वाद होत असल्याचे पाहायला मिळत आहे. रमा संतापाने इरावतीला म्हणते, “इरावती, मुकादमांच्या घराची धूळदाण व्हायला कारणीभूत कोण आहे, हे मी अक्षयसमोर उघड करणार आहे.” त्यानंतर रमा तिथून निघून जाते. इरावती म्हणते की, त्याआधी मोठा खेळ मी खेळणार आहे आणि ती विचित्र हसते.

दुसरीकडे रमा अक्षयकडे जाते आणि म्हणते, “मला आज तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे”, अक्षय तिला रमा बोल, असे म्हणतो. तितक्यात रमाचे मानलेले वडील अण्णासाहेब येतात. ते मोठ्याने रमा, अशी हाक मारतात. ते म्हणतात, “आरोही ही तुझी मुलगी आहे, हे तू मला सांगितलं होतंस? आणि तुझ्यावर अन्याय करणारा तुझा हा नवरा आहे, हे तू मला सांगितलं होतंस का?” अक्षय पुढे जातो आणि त्यांच्यासमोर हात जोडत अण्णासाहेब, असे म्हणतो.

अण्णासाहेब त्याला हात उंचावून थांबण्याचा इशारा करतात. ते त्याला म्हणतात, “मी माझ्या मुलीशी बोलतोय; तुझा काहीही संबंध नाही.” तितक्या इरावती येते. ती त्यांना म्हणते, “संबंध नाही, तर तुमच्या मुलीला इथून कायमची घेऊन जा.” त्यावर अण्णासाहेब रमाचा हात धरतात आणि तिला घेऊन जातात. अक्षय तिला थांबवण्यासाठी पुढे जातो, तर इरावती त्याला थांबवते. रमा आणि अक्षय दोघांच्याही चेहऱ्यावर दु:ख दिसत आहे.

नेटकरी काय म्हणाले?

हा प्रोमो शेअर करताना स्टार प्रवाह वाहिनीने, इरावतीमुळे पुन्हा होणार रमा-अक्षयची ताटातूट, अशी कॅप्शन दिली आहे. आता हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करीत प्रतिक्रिया दिल्या आहेत. “अरे, आता बास करा. जरा काही चांगले झाले की, काहीतरी वाट लावतातच”, “त्यांना नीट भेटू दिले नाही, त्यांना लगेच वेगळे केले”, “प्रेक्षकांचा खूप अंत पाहतात”, “त्या इरावतीचे सत्य सर्वांसमोर आणा”, “रमाला पुन्हा इतकं साधं दाखवत आहात”, “इरावतीचे सत्य सर्वांसमोर आणा. पुन्हा अक्षय व रमाला एकत्र दाखवा”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.