Namrata Sambherao : आपल्या हरहुन्नरी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री म्हणून नम्रता संभेरावला ओळखलं जातं. मराठी नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये अभिनेत्रीने आपला ठसा उमटवला आहे. गेली अनेक वर्षे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून नम्रता रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. विनोदाचं अचूक टायमिंग साधत या अभिनेत्रीने सर्वांना खळखळून हसवलं तर, ‘नाच गं घुमा’सारख्या चित्रपटातून नम्रताची एक वेगळी बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वैयक्तिक आयुष्यात नम्रताने २०१३ मध्ये योगेश संभेराव यांच्याशी लग्नगाठ बांधली. दोघेही एकत्र कॉलेजमध्ये होते, त्यानंतर सोशल मीडियामुळे त्यांची मैत्री आणखी वाढली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन या दोघांनी लग्न केलं. या जोडप्याला रुद्राज नावाचा गोड मुलगा आहे. आज आपल्या पतीच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट लिहित नम्रताने शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : “लाज लज्जा सोडून, कोणाची ही तमा न बाळगता…”, समीर परांजपेसाठी लोकप्रिय दिग्दर्शकाने लिहिलेली पोस्ट होतेय व्हायरल, वाचा

नम्रता संभेरावची पतीसाठी खास पोस्ट

नम्रताचे ( Namrata Sambherao ) पती योगेश संभेराव यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने पोस्ट शेअर करत अभिनेत्री लिहिते,

Happy Birthday Yogsss
तू जो है साथ तो ये अंबर
लगे कि जैसे साया हो सर पर
तेरे काँधे पर रखकर सर
यूँ ही कट जाए सारी उमर

तुझी सगळी स्वप्न पूर्ण होवोत. आयुष्यभर असाच रुबाबदार रहा… हसत रहा… माझ्याबरोबर रहा… खूश रहा..I love you

नम्रताने ( Namrata Sambherao ) अशी रोमँटिक पोस्ट शेअर करत आपल्या पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये अभिनेत्री पतीच्या खांद्यावर डोकं ठेवून असल्याचं पाहायला मिळत आहे. या गोड फोटोवर नम्रताच्या चाहत्यांसह नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा : “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा…”, ‘अंतरपाट’ मालिकेत झळकलेल्या अभिनेत्रीची पतीसाठी खास पोस्ट, म्हणाली…

हेही वाचा : Video: रेवाच्या हातात बेड्या ठोकण्यासाठी रमा-अक्षय सज्ज; ‘मुरांबा’चा प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले, “देव करो आणि आता…”

दरम्यान, नम्रताच्या ( Namrata Sambherao ) कामाबद्दल सांगायचं झालं, तर काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘नाच गं घुमा’ चित्रपटात नम्रताने मुक्ता बर्वेसह प्रमुख भूमिका साकारली होती. आता लवकरच ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाच्या नव्या पर्वातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Namrata sambherao writes romantic post for husband yogesh sambherao on the occassion of his birthday sva 00