बॉलीवूडमधील लोकप्रिय गायिका म्हणून नेहा कक्करला ओळखलं जातात. ‘काला चष्मा’, ‘बद्री की दुल्हनिया, ‘दिलबर’, ‘आँख मारे’ अशी बरीच गाणी तिने गायली आहेत. याशिवाय अनेक चित्रपटांसाठी व अल्बमसाठी नेहाने पार्श्वगायिका म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. तिची बहुतांश गाणी इन्स्टाग्राम रील्सवर व्हायरल होत असतात. सध्या नेहा ‘सुपरस्टार सिंगर ३’ या कार्यक्रमात मुख्य परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेहा कायमच स्पर्धकांना प्रोत्साहन देत असल्याचं पाहायला मिळतं. ‘सुपरस्टार सिंगर ३’ या कार्यक्रमात लहान वयोगटातील मुलं सहभागी झाली आहेत. या सगळ्या मुलांना नेहा उत्तम मार्गदर्शन करत असते. अशातच या शोमध्ये नुकतीच एका खास पाहुण्याने हजेरी लावली होती. हा पाहुणा नेमका कोण आहे जाणून घेऊयात…

हेही वाचा : २ वर्षे डेट केल्यावर आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचं ब्रेकअप? जवळच्या मित्रानेच केला खुलासा

सध्या जगभरात संजू राठोडच्या ‘गुलाबी साडी’ गाण्याची चर्चा चालू आहे. सेलिब्रिटींपासून ते अगदी सामान्य लोकांपर्यंत आजकाल प्रत्येकजण गुलाबी साडी गाण्यावर थिरकत असल्याचं पाहायला मिळत आहे. बॉलीवूड धकधक गर्ल माधुरी दीक्षितपासून ते आफ्रिकेच्या किली पॉलपर्यंत प्रत्येकाने या गाण्यावर जबरदस्त डान्स केल्याचं आपण गेल्या काही दिवसांमध्ये पाहिलं आहे.

हेही वाचा : Video : आलियाची लाडकी लेक पहिल्यांदाच काकाबरोबर फिरताना दिसली…; राहा कपूरचे हावभाव पाहून नेटकरी म्हणाले…

गुलाबी साडी गाण्याचा गायक संजू राठोडने नुकतीच नेका कक्करच्या ‘सुपरस्टार सिंगर ३’ या शोमध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी सगळे स्पर्धक आणि परीक्षक एकत्र या गाण्यावर थिरकत असल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय नेहा कक्करने संजू राठोडबरोबर एक खास व्हिडीओ शेअर करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा : Video : अकायच्या जन्मानंतर पहिल्यांदाच स्टेडियममध्ये आली अनुष्का शर्मा! विराट कोहली बाद झाल्यावर दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

नेहाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती ‘गुलाबी साडी’ गाण्याच्या स्टेप्स अगदी हुबेहूब करत असल्याचं पाहायला मिळत आहे. गायिका लिहिते, “भेटा या संजू राठोडला…याच माणसाने गुलाबी साडी हे अफलातून गाणं क्रिएट केलंय…तुला खूप आशीर्वाद, गॉड ब्लेस यू संजू…थँक्यू ‘सुपरस्टार सिंगर ३” दरम्यान, नेहाने शेअर केलेल्या व्हिडीओवर संजूने “मॅम…” अशी कमेंट करत कृतज्ञता व्यक्त केली आहे. याशिवाय नेटकऱ्यांनी सुद्धा संजू राठोडला त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neha kakkar vibes on sanju rathod gulabi sadi song video viral sva 00