विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची जोडी कायम चर्चेत असते. १५ फेब्रुवारी २०२४ रोजी या जोडप्याने त्यांच्या दुसऱ्या अपत्याचं म्हणजेच अकाय स्वागत केलं. यावेळी अनुष्का लंडनमध्ये होती. बाळाच्या जन्मानंतर विरुष्काने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत त्यांच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती. यानंतर मार्च महिन्यात आयपीएलसाठी विराट एकटा भारतात दाखल झाला होता.

विराट आल्यानंतर अनुष्का भारतात केव्हा येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर एप्रिल महिन्यात अभिनेत्री भारतात परतली होती. परंतु, लंडनहून परतल्यावर तिने कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थिती लावली नव्हती. एवढेच नव्हे तर विमानतळावर देखील सगळ्या पापाराझींना मुलं बरोबर असल्याने फोटो काढू नका अशी विनंती अनुष्काने केली होती. १ मे रोजी अनुष्काच्या वाढदिवसाच्या पार्टीतील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. भारतात आल्यावर अनुष्का RCBची मॅच पाहायला केव्हा येणार याकडे विरुष्काच्या लाखो चाहत्यांचं लक्ष लागलेलं होतं. अखेर ४ मे रोजी झालेल्या RCB विरुद्ध गुजरातच्या सामन्यात अनुष्काने उपस्थिती लावल्याचं पाहायला मिळालं.

IND vs PAK Match Mohammed Siraj aggressive throw hits Rizwan Hand
VIDEO : ‘भाई ये क्या कर दिया…’, सिराजने मुद्दाम रिझवानला चेंडू मारला? चाहत्यांच्या प्रतिक्रिया व्हायरल
Challenges facing India Aghadi politics bjp
लेख: इंडिया आघाडीसमोरील आव्हाने
Pimpri, Ex-boyfriend,
पिंपरी : प्रेयसीला भेटायला आलेल्या एक्स बॉयफ्रेंडला प्रियकराने कारने उडवले; बॉयफ्रेंड गंभीर जखमी
rafael nadal loses in the french open s first round
पहिल्याच फेरीत नदाल गारद; जर्मनीच्या ॲलेक्झांडर झ्वेरेवकडून सरळ सेटमध्ये पराभूत
man shoots dj oprator in ranchi,
धक्कादायक! मद्य न दिल्याने थेट बारमधील डीजे ऑपरेटरच्या छातीत झाडल्या गोळ्या; जागीच मृत्यू
RCB fans abuse CSK fans video viral
RCBच्या विजयानंतर बेभान झालेल्या चाहत्यांचे गैरवर्तन, CSKच्या फॅन्सशी धक्काबुक्की केल्याचा VIDEO व्हायरल
KL Rahul Catch and LSG Owner Sanjeev Goenka Reaction Video
LSG v DC: केएल राहुलचा डायव्हिंग झेल पाहून संजीव गोयंका जागेवरून उठले अन्… VIDEO मध्ये पाहा काय घडलं?
KKR Seo on Rohit Sharma Abhishek Nayar Viral Video
IPL 2024: रोहित शर्मा-अभिषेक नायर ‘त्या’ व्हायरल व्हीडिओमध्ये नेमकं काय बोलत होते? KKR च्या सीईओने केला खुलासा

हेही वाचा : OTT Releases : घरबसल्या पाहता येणार ‘हे’ १० चित्रपट अन् वेबसीरिज; अजय देवगणच्या थरारक चित्रपटाचा समावेश, वाचा यादी

गुजरात टायटन्सने पहिली फलंदाजी करत आरसीबीसमोर १४८ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. याचा पाठलाग करत असताना आरसीबीने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली. RCB हा सामना लवकर संपवेल असं वाटत असतानाच फाफ डु प्लेसिस बाद झाला. यामुळे आरसीबीचा डाव काहीसा गडगडला. परंतु, विराट मैदानावर असल्याने सर्वांनाच विजयाची खात्री होती.

हेही वाचा : हृदयविकाराचा झटका कशामुळे आला? श्रेयस तळपदे म्हणाला, “करोनाची लस घेतल्यावर…”

आरसीबीच्या संघाने ११ व्या ओव्हरमध्ये ११७ धावा केल्या होत्या. अशातच नूर अहमदने विराटची विकेट घेतली. कोहली बाद झाल्यावर स्टेडियममध्ये शांतात पसरली अन् इतक्यात अनुष्काने दिलेली प्रतिक्रिया सुद्धा कॅमेऱ्यात कैद झाली. नवरा ४२ धावांवर बाद झाल्यावर अनुष्का पूर्णपणे शांत झाली. तिच्या चेहऱ्यावरची नाराजी स्पष्ट दिसत होती. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अभिनेत्याच्या घरी चिमुकलीचं आगमन, पहिली झलक शेअर करत म्हणाला, “इतकं भारावून जाणं…”

दरम्यान, कोहली बाद झाल्यावर दिनेश कार्तिकने आरसीबीचा डाव सांभाळला. आरसीबीने घरच्या मैदानावर मोठा विजय मिळवत गुजरातचा ४ विकेट्सने पराभव केला. गुजरातला पराभूत केल्यानंतर आरसीबीने १०व्या क्रमांकावरून थेट सातव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.