‘बिग बॉस १३’ फेम अभिनेत्री दलजीत कौर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेले काही दिवस ती सातत्याने तिच्या दुसऱ्या पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोप करत होती. तिने काही स्क्रीनशॉट्सही शेअर केले होते. मागच्या वर्षी मार्च महिन्यात एनआरआय निखिल पटेलशी लग्न केल्यानंतर ती केनियाला शिफ्ट झाली होती. पण काही महिन्यांतच ती मुलाबरोबर परत आली. मग तिने लग्नाचे व पतीबरोबरचे इतर फोटो डिलीट केले.

तिने काही पोस्ट करत पतीचे अफेअर असल्याचा दावा केला होता. याबाबत आता निखिलने पहिल्यांदाच त्याच्या बाजूने स्पष्टीकरण दिलं आहे. निखिल म्हणाला, “दलजीतने तिचा मुलगा जेडनबरोबर या वर्षी जानेवारीमध्ये केनिया सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे शेवटी आम्ही वेगळे झालो. आम्हा दोघांना लक्षात आलं की आमच्या कुटुंबाचा पाया आम्हाला वाटत होता तितका मजबूत नाही. दलजीतला केनियामध्ये स्थायिक होणं झालं. मार्च २०२३ मध्ये आम्ही मुंबईत भारतीय पद्धतीने लग्न केलं होतं. लग्नाला सांस्कृतिक महत्त्व असलं तरी ते कायद्याने बंधनकारक नव्हतं. या लग्नाचा उद्देश दलजीतच्या कुटुंबाला तिच्या केनियाला जाण्याबद्दल धीर देण्यासाठी होता. आम्ही प्रयत्न केले, पण करिअर आणि भारतातील आयुष्य सोडून दलजीतला केनियात जुळवून घेता आलं नाही. परिणामी नात्यातील गुंतागुंत वाढत गेली.”

पतीचे विवाहबाह्य संबंध? वर्षभरापूर्वी दुसरं लग्न करणाऱ्या अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत; म्हणाली, “मुलांसाठी गप्प…”

“वेगवेगळ्या संस्कृती, वेगळ्या श्रद्धा आणि मूल्ये यामुळे आमच्यासाठी हे नातं टिकवणं खूप आव्हानात्मक झालं. आमचं नातं परिपक्व झाल्यावर या गोष्टी होऊ लागल्या. माझ्या मुलींना एक आई आहे, त्यामुळे दलजीत व माझ्या मुलींमधील नातं कधीच बदलू शकत नाही,” असं निखिलने नमूद केलं. ‘ई-टाइम्स’ने याबद्दल वृत्त दिलंय.

अवघ्या १० महिन्यांत मोडलं प्रसिद्ध अभिनेत्रीचं दुसरं लग्न; पतीच्या अफेअरबद्दल स्क्रीनशॉट्स केले शेअर

तिने सर्व मर्यादा ओलांडल्या – निखिल पटेल

निखिल पुढे म्हणाला, “ज्या दिवशी दलजीतने केनिया सोडण्याचा निर्णय घेतला त्यादिवशी ती तिचं इथे राहिलेलं सामान घेण्यासाठीच परत येईल असं तिने मला सांगितलं. मी तिचं सगळं सामान जपून ठेवलंय, ती गेल्यानंतर माझ्यासाठी आमचं नातं संपलंय, तसेच गेल्या पाच महिन्यांतील तिच्या सोशल मीडिया पोस्ट पाहिल्यानंतर मी आयुष्यात पुढे जायचं ठरवलं आहे. दलजीतने नुकत्याच सोशल मीडियावर काही पोस्ट केल्या आहेत, त्यामुळे मी गोंधळलो आहे आणि मला त्रास झाला आहे. तिने माझ्या आयुष्यात परत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे पण आता तिने सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. तिच्या पोस्ट आणि तिच्या पोस्टचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे, तिच्या पोस्टमुळे कुटुंबियांना व मित्रांना नाहक त्रास होतोय, त्यामुळे ती असं वागणं थांबवेल, अशी मी आशा करतो,” असं निखिल म्हणाला.

एकेकाळी आमिर खानचा बॉडीगार्ड होता ‘हा’ अभिनेता, बारटेंडर म्हणूनही केलं काम, आता…

निखिलने दलजीतला दिल्या शुभेच्छा

निखिलने दलजीत कौरला तिच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. “मी नेहमीच आदराने गैरसमज दूर करण्यावर विश्वास ठेवतो. हे फक्त माझ्यासाठी नाही तर आमच्याशी संबंधित प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे. मी दलजीतला मनापासून शुभेच्छा देतो आणि आशा करतो की आम्ही सकारात्मकतेने आपापल्या आयुष्यात पुढे जाऊ शकू,” असं निखिल पटेल म्हणाला.