‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय ‘पारु’ आणि ‘लक्ष्मी निवास’ मालिकेचा सध्या महासंगम पाहायला मिळत आहे. यामध्ये किर्लोस्कर आणि दळवी कुटुंबाचं भव्य मंगलकार्य सुरू आहे. जान्हवीच्या हाताला जयंत नावाची मेहंदी लागली आहे. एकाबाजूला जयंत-जान्हवीच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली असली तरी दुसऱ्या बाजूलाचा आदित्यच्या लग्नाचा तिढा कायम आहे. आदित्यचं लग्न पारुशी होणार की नाही? याकडेचं सध्या सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किर्लोस्कर आणि दळवी कुटुंबाचं भव्य मंगलकार्य असल्यामुळे ‘पारु’ आणि ‘लक्ष्मी निवास’ मालिकेमधील कलाकार सध्या एकत्र पाहायला मिळत आहेत. सेटवरील धमाल, मस्तीचे व्हिडीओ कलाकार शेअर करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी ‘लक्ष्मी’ आणि ‘अहिल्यादेवी’ म्हणजे अभिनेत्री हर्षदा खानविलकर, मुग्धा कर्णिक एकत्र डान्स करताना पाहायला मिळाल्या होत्या. त्यानंतर आता ‘पारु’ आणि ‘लक्ष्मी निवास’मधील काही कलाकारांच्या डान्स व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

या व्हिडीओमध्ये ‘पारु’ आणि ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील तन्वी कोलते, पल्लवी वैद्य, स्वाती देवल, अनुज ठाकरे, महेश फाळके, तेजस पिंगुळेकर आणि संजना काळे पाहायला मिळत आहेत. यामध्ये कलाकार अनिल कपूर-अमृता सिंहच्या ‘यार बिना चैन कहा रे’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. ‘पारु’ आणि ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील कलाकारांचा हा डान्स व्हिडीओ सध्या खूपच चर्चेत आला आहे.

दरम्यान, ‘पारु’ आणि ‘लक्ष्मी निवास’ मालिकांचा हा महासंगम प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. दोन्ही मालिकांना सध्या प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. २७ जानेवारीपासून सुरू झालेला हा महासंगम १ फेब्रुवारीपर्यंत पाहायला मिळणार आहेत. या महासंगममध्ये बहीण जान्हवीच्या लग्नात भावना आणि सिद्धू यांच्यात गैरसमज निर्माण होणार आहेत. सिद्धूला असं वाटतंय की आदित्यचं भावनाचा नवरा आहे आणि भावना एका मुलीची आई आहे. यामुळे तो अस्वस्थ आहे. सिद्धूला अजून एक धक्का बसतो जेव्हा त्याला समजतं की लक्ष्मी हीच सिंचनाची सासू आहे. हे ऐकून तो चक्रावून जातो. विश्वाही या लग्नासाठी आलाय. तिथे त्याची प्रीतमशी भेट होते. ते दोघं मिळून हे भव्य मंगलकार्य बिघडवायचं ठरवतात. मात्र, विश्‍वा जान्हवीच्या चेहऱ्यावर आनंद बघून विचार बदलतो. या प्रसंगी पारू आणि सिद्धूची मैत्री होते, जिथे सिद्धू आदित्यचं अपहरण करायचं ठरवतो.

दिशा आणि अनुष्काला एकत्र बघून पारुसमोर त्यांचं सत्य बाहेर येईल? तसंच, रवीला समजतं की तो ज्या व्यक्तीला खूप काळापासून व्यवसायासाठी कॉल करत होता, तो दुसरा कोणी नसून संपतरावच आहे. हे अपघाताचं सत्य जर कोणी बाहेर काढलं तर काय होईल, या काळजीत रवी आहे. या सगळ्यात जयंत जान्हवीचं लग्न आणि आदित्य-अनुष्काचा साखरपुडा कसा पार पडणार? हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paaru and lakshmi nivasa fame actors actress dance on anil kapoor song pps