Sharayu Sonawane And Shweta Kharat Dance Video : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेतील साध्या, सरळ आणि सोज्वळ पारूची कथा प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. त्यामुळे मालिकेचा दिवसेंदिवस प्रेक्षक वर्ग वाढताना दिसत आहे. अभिनेत्री शरयू सोनावणे, प्रसाद जवादे, मुग्धा कर्णिक, विजय पटवर्धन, संजना काळे, शंतून गंगणे, पूर्वा शिंदे, श्वेता खरात असे तगडे कलाकार मंडळी ‘पारू’ मालिकेत पाहायला मिळत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या ‘पारू’ मालिकेत भव्य मंगलकार्य सुरू आहे. आदित्य आणि अनुष्का लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांचा साखरपुडा झाला आहे. पण, आता आदित्यचं लग्न नेमकं अनुष्काची होणार की पारूशी हे पाहणं उत्सुकतेचं आहे. मालिकेत सध्या हे रंजक वळण सुरू असताना सोशल मीडियावर ‘पारू’ मालिकेतील कलाकारांच्या रील व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे. ‘पारू’ मालिकेतील कलाकार नेहमी रील व्हिडीओ करत असतात. सध्या पारू-अनुष्का म्हणजेच अभिनेत्री शरयू सोनावणे आणि श्वेता खरातच्या डान्स व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अभिनेत्री शरयू सोनावणेने हा डान्स व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये शरयू आणि श्वेता शाहिद कपूर, सोनाक्षी सिन्हाच्या ‘साडी के फॉल सा’ या सुपरहिट गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहेत. दोघींच्या एक्सप्रेशनचं चाहते कौतुक करत आहेत.

दरम्यान, आतापर्यंत शरयू सोनावणे आणि श्वेता खरातचा हा व्हिडीओ ७ लाखांहून अधिक जणांनी पाहिला आहे. तर २५ हजारांहून अधिक जणांनी लाइक केला आहे. तसंच ‘पारू एक नंबर दिसतेय’, ‘पारू खूप भारी करतेय’, ‘पारूचे एक्सप्रेशन खूप छान आहेत’, ‘एकदम कडक’, ‘मस्त’, ‘दोघींची जोडी भारी आहे’, अशा प्रतिक्रिया चाहत्यांच्या उमटल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paaru fame sharayu sonawane and shweta kharat dance on shahid kapoor song saree ke fall sa pps