Prajakta Gaikwad Announces Her Wedding Date : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत महाराणी येसूबाईंची भूमिका साकारून घराघरांत पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड. आपल्या अभिनयाने चर्चेत असणारी प्राजक्ता गेल्या काही दिवसांपासून लग्नामुळे चर्चेत आहे. प्राजक्ता गायकवाड लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिने लग्न करणार असल्याची खुशखबर शेअर केली होती. अशातच आता अभिनेत्रीने लग्नाची तारीखही जाहीर केली आहे.
काही दिवसांपूर्वी प्राजक्तानं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या काही फोटोंमध्ये ती पाहुणे मंडळींच्या गराड्यात बसलेली दिसली. तसेच, प्राजक्तानं पारंपरिक पोशाख परिधान केला होता. हे पाहून चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली होतीच. त्यानंतर स्वत: प्राजक्ताने होणाऱ्या नवऱ्याबरोबरचे गोड फोटो शेअर करीत सर्वांना खुशखबर दिली. तेव्हापासून तिच्या चाहत्यांना प्राजक्ता लग्न कधी करणार? अशी उत्सुकता लागून राहिली होती. अखेर प्राजक्ताने तिच्या लग्नाची तारीख आणि वेळ सांगितली आहे.
प्राजक्तानं सोशल मीडियावर लग्नपत्रिका पूजनाची खास पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीनं शेअर केलेल्या व्हिडीओमधील पत्रिकेवरील माहितीनुसार तिचे लग्न येत्या २ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. प्राजक्तानं शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये लग्नपत्रिकाच्या आजूबाजूला हळद-कुंकू, अक्षता, गुलाबाच्या पाकळ्या आणि मोराचे पिस अशी खास सजावटही पहायला मिळत आहे. तसंच या लग्नाच्या पत्रिकेचे डिझाइन अगदी पारंपरिक पद्धतीचं आहे.
लग्नपत्रिका शेअर करताना प्राजक्ताने केवळ तारीखच नव्हे तर मुहूर्तही सांगितला आहे. प्राजक्ता गायकवाड आणि शंभुराज खुटवड यांचं लग्न २ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजून २४ मिनिटे, या शुभ मुहूर्तावर पार पडणार आहे. दरम्यान, प्राजक्ताने शेअर केलेल्या या व्हिडीओखाली कमेंट्समध्ये चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
प्राजक्ता गायकवाडने शेअर केलेला लग्न पत्रिकेचा व्हिडीओ
७ ऑगस्ट २०२५ रोजी प्राजक्ताचा साखरपुडा पार पडला, याचे काहीए खास क्षण तिने आपल्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले होते. रोमँटिक पोज देत या जोडीने फोटोशूटही केले होते. या फोटोंमधूनच प्राजक्ताच्या होणाऱ्या नवऱ्याचा, म्हणजेच शंभुराज खुटवडचा चेहरा पहिल्यांदा सर्वांसमोर आला. तेव्हापासून चाहते दोघांच्या लग्नाची आतुरेतेने वाट पाहत होते. आता ही आतुरता संपली आहे. प्राजक्ता-शंभुराज लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.