लोकप्रिय मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान ही गेल्या काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे. ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ या तिच्या चित्रपटामुळे अभिनेत्री मोठ्या चर्चेत आहे. सुबोध भावेबरोबर तिने चित्रपटात स्क्रीन शेअर केली आहे. सध्या तेजश्री स्टार प्रवाहवरील ‘प्रेमाची गोष्ट'(Premachi Goshta) या मालिकेत काम करताना दिसत आहे. आता मालिकेतील एका सीनच्या शूटिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुक्ता टाकीत बुडतानाचा ‘सीन’ असा झाला शूट

स्टार प्रवाह वाहिनीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेच्या शूटिंगदरम्यानचा आहे. मुक्ता पाण्याच्या टाकीत बुडत असते, त्यावेळचा हा व्हिडीओ आहे. हा सीन कसा शूट झाला, हे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला मुक्ता पाण्यात बुडत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर पाहायला मिळते की, मुक्ता एका मोठ्या पाण्याच्या टाकीत उतरते. व्हिडीओ शूट करणारी व्यक्ती म्हणते, ‘ही बघा मुलगी, स्वत:च बुडणार आहे आणि स्वत:च पाणी भरत आहे. ‘ त्यावर मुक्ता हसताना दिसत आहे. त्यानंतर पुढे मुक्ताचे हात बांधले असून, ती वाचवा असे म्हणताना दिसत आहे. सीन शूट झाल्यानंतर ती टाकीतून वर येते. तिच्या चेहऱ्यावर त्यावेळी आनंद पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना स्टार प्रवाह वाहिनीने, “असा शूट झाला मुक्ताचा टाकीत बुडतानाचा सीन”, अशी कॅप्शन दिली आहे. याबरोबरच तेजश्री प्रधानला टॅगदेखील केले आहे.

स्टार प्रवाह इन्स्टाग्राम

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत दाखविल्याप्रमाणे सागर व मुक्ता पती-पत्नी आहेत. मात्र, सागरचे हे दुसरे लग्न आहे. त्याची पहिली पत्नी सावनी त्यांना सतत त्रास देताना दिसते. मुक्ता व सागरच्या कुटुंबाला संकटात आणताना दिसते. आता मुक्तावर आलेले हे संकट सावनीमुळे आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सावनी मुक्ता-सागरबरोबर त्यांच्या घरात राहत होती. चांगले वागण्याचे नाटक करत होती. सागरच्या लहान बहिणीला तिने फसवण्याचा प्लॅन केला होता. मात्र, वेळीच तिचा प्लॅन मुक्ताच्या लक्षात आला. सागरच्या बहिणीसाठी ज्या मुलाचे स्थळ आले होते, तो मुलगा वाईट असल्याचे मुक्ताला समजले. आता सावनीचे सत्य सर्वांसमोर आल्यानंतर मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा: ‘वनवास’कडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ, चार दिवसांची कमाई साडेतीन कोटींपेक्षाही कमी

दरम्यान, तेजश्री प्रधान ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतून घराघरांत पोहोचली. जान्हवी या तिच्या पात्राला मोठी लोकप्रियता मिळाल्याचे दिसले. त्यानंतर अभिनेत्रीने अनेक चित्रपट-मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Premachi goshta bts mukta drowning in the tank shooting video marathi serial behind the scene watch nsp