सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका खूप चर्चेत आहे. कारण आहे तेजश्री प्रधान. अभिनेत्री तेजश्री प्रधानने ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका अचानक सोडल्यामुळे चाहत्यांसह प्रेक्षकांना धक्का बसला आहे. सोशल मीडियावर नाराजीचे सूरज पाहायला मिळत आहेत. ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत तेजश्रीची जागा अभिनेत्री स्वरदा ठिगळे घेतली आहे. लवकरच स्वरदा मुक्ताच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सध्या एकाबाजूला तेजश्रीच्या एक्झिटमुळे मालिकेविषयी खूप चर्चा रंगली आहे. त्यातच दुसऱ्या बाजूला ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील अभिनेता बायकोबरोबर परदेशात फिरायला गेला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मिहिर म्हणजे अभिनेता राजस सुळे डिसेंबर २०२४मध्ये लग्नबंधनात अडकला. चैत्रीला पितळे हिच्याशी राजसने लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. गेल्या नऊ वर्षांपासून दोघं रिलेशनशिपमध्ये होते. अखेर डिसेंबर २०२४मध्ये राजस आणि चैत्रीलाचा मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पाहायला मिळाला.

हेही वाचा – Video: ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ मालिकेतील कलाकारांनी निवेदिता सराफांना वाढदिवसानिमित्ताने दिलं खास सरप्राइज, पाहा व्हिडीओ

लग्नासाठी राजस सुळे आणि चैत्राली पितळेने राजेशाही लूक केला होता. लग्नाच्या १९ दिवसांनंतर दोघं आता परदेशात फिरायला गेले आहेत. याचे फोटो, व्हिडीओ दोघांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. “चला जाऊया…” असं लिहित चैत्रालीने विमानतळाबाहेरील फोटो शेअर केला आहे. त्यानंतर राजसचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे.

राजस सुळे इन्स्टाग्राम स्टोरी
https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/01/Rajas-Sule.mp4

मग राजसच्या पत्नीने फिरायला जाण्याचा ठिकाणाचा खुलासा केला आहे. तिसऱ्या स्टोरीमध्ये तिने नेटकऱ्यांना काही पर्याय देऊन फिरायला जाण्याचं ठिकाण निवडायला सांगितलं होतं. यावेळी नेटकऱ्यांनी अचूक उत्तर दिलं. राजस आणि चैत्राली न्यूझीलंडला फिरायला गेले आहेत.

राजस सुळे इन्स्टाग्राम स्टोरी

हेही वाचा – “रिप्लेसमेंटवाल्या भूमिका कलाकारांनी घेऊ नये…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील बदलावर युजरची प्रतिक्रिया; नवी मुक्ता म्हणाली, “आजही कलेचे…”

दरम्यान, अभिनेता राजस सुळेने २०२३मध्ये प्रेमाची कबुली दिली होती. ‘हंच मीडिया’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधताना राजस म्हणाला होता की, गेल्या आठ वर्षांपासून मी रिलेशनशिपमध्ये आहे. यावेळी त्याने चैत्रालीबरोबरचा फोटो देखील दाखवला होता. राजसच्या कामाबद्दल बोलायचं झालं, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेमुळे तो घराघरात पोहोचला आहे. त्याने साकारलेली मिहीरची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या आधी अभिनेता ‘हर हर महादेव’ चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात त्याने सदाची भूमिका साकारली होती. तसंच त्याने ‘एबीपी माझा’ वाहिनीवरील ‘मन सुद्ध तुझं’ या कार्यक्रमात काम केलं होतं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Premachi goshta fame rajas sule went on trip to new zealand with wife after wedding 19 days pps