गेले काही दिवस राखी सावंत विविध कारणांमुळे चर्चेत आहे. राखी सावंतने आदिल खानशी लग्न केल्याचं काही दिवसांपूर्वीच समोर आलं होतं. तर नुकतंच तिच्या आईचा निधन झालं. त्यानंतर राखी पुन्हा एकदा तिच्या संसारामुळे चर्चेत आली आहे. तिचा पती आदिल खान याचं दुसऱ्याच एका मुलीबरोबर अफेअर असल्याचा खुलासा तिने दोन दिवसांपूर्वी केला होता. तर त्याचबरोबर तिच्या वैयक्तिक आयुष्य बाबत अनेक गोष्टी तिने उघड केल्या. आता तिच्या या बोलण्यावर तिचा भाऊ राकेश सावंत याने प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आदिल खान याचा एका दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर सुरू आहे आणि तो त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर राहतोय. यामुळे त्यांचं लग्न टिकणं कठीण वाटत असल्याचं राखीने सांगितलं होतं. त्यानंतर आदिल त्या मुलीशी असलेलं नातं तोडून राखीकडे परत आल्याचं राखीने सांगितलं. तर आता पुन्हा एकदा आदिल त्याच मुलीबरोबर राहत असल्याचा खुलासा राखीने केला. आता या सगळ्याबाबत तिच्या भावाने प्रतिक्रिया देत राखीच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका अशी विनंती केली आहे.

आणखी वाचा : लगीन घटिका समीप आली! ‘असा’ आहे सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाचा शाही थाट, विवाहस्थळाचे Inside Videos व्हायरल

राकेश सावंत म्हणाला, “ती उदास असल्याने काहीही बोलत आहे. ति जे बोलत आहे त्याचं तिला भान नाहीये. माझी सर्व जनतेला आणि राखीच्या चाहत्यांना एवढीच विनंती करायची आहे की, तिच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका. त्याचबरोबर तिच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नका. आत्ता तिला तुमच्या प्रेमाची गरज आहे. कृपया तिला सांभाळून घ्या.”

हेही वाचा : वयाच्या ४४ व्या वर्षी राखी सावंत गरोदर? प्रतिक्रिया देत अभिनेत्री म्हणाली…

राकेश सावंतचा हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी त्यांची प्रतिक्रिया देत आहेत. तर काहींनी या व्हिडीओवर कमेंट करत राखीला ट्रोल केलं आहे. राकेश सावंतचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakhi sawant brother rakesh sawant gave reaction on rakhi sawant statements rnv