‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील नेत्रा म्हणजे अभिनेत्री तितीक्षा तावडे लवकरच बोहल्यावर चढणार आहे. अभिनेता सिद्धार्थ बोडकेबरोबर तितीक्षा लग्नबंधनात अडकून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. याचा खुलासा काल, ८ फेब्रुवारीला अभिनेत्रीने सोशल मीडियाद्वारे केला. पहिल्या केळवणाचा फोटो शेअर करून तितीक्षाने ही आनंदाची बातमी दिली. तेव्हापासून अभिनेत्रीसह अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच तितीक्षाने लग्नाआधीच्या व्हॅलेंटाईनचा काय प्लॅन असणार आहे? हे शेअर केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम शिवानी रांगोळे व्हॅलेंटाईन डे कसा करणार साजरा? म्हणाली, “आमचा…”

अभिनेत्री तिताक्षा तावडे म्हणाली, “प्रेम व्यक्त करण्याच्या बाबतीत मी खूप एक्सप्रेसिव्ह आहे. ज्या व्यक्तींवर माझं प्रेम आहे त्यांना वेळ देणं, त्यांच्याशी सतत संपर्कात राहणं आणि त्यांना जाणीव करून देणं की तुमची काळजी करायला मी आहे. ही माझी प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आहे.”

हेही वाचा – अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणावर मराठी अभिनेत्रीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाली, “आपण किती…”

पुढे अभिनेत्री म्हणाली, “माझ्या त्या प्रिय व्यक्तीला म्हणजेच सिद्धार्थ बोडकेला एक निरोप देईन की, प्रेम काय आहे हे कोणी अजून डिकोड नाही केलंय तर आपण दोघे मिळून ते डिकोड करण्याचा प्रयत्न करू. थोडं तू चूक, थोडं मी चुकते आणि चुकीतून शिकून मोठं होऊ आणि भरभरून प्रेम करायला शिकू. १४ फेब्रुवारीला ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ शूटिंग करत असणार पण त्यानंतर जो काही थोडा वेळ मिळणार आहे तो मी सिद्धार्थबरोबर घालवणार आहे.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saatvya mulichi saatvi mulgi fame actress titeeksha tawde valentine day plan before wedding pps