अभिनेत्री सई लोकूर बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वामुळे घराघरांत पोहोचली. वैयक्तिक आयुष्यात ३० नोव्हेंबर २०२० मध्ये सईने तीर्थदीप रॉयशी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या तीन वर्षांनंतर १७ डिसेंबर २०२३ रोजी तिने गोंडस मुलीला जन्म दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सई सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. चाहत्यांबरोबर संपर्कात राहण्यासाठी सई आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी त्यांच्याबरोबर शेअर करीत असते. लग्नापासून ते मुलीच्या जन्माच्या गोड बातमीपर्यंत तिने आपला प्रवास सगळ्यांबरोबर शेअर केला आहे. नुकतीच सई तिच्या पतीसह आणि लेकीसह सिंगापूरला जाऊन आली. सईची लेक ताशी हिची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय सहल होती. याचे फोटो सईने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हेही वाचा… “मला पाच-सहा वेळा कानाखाली मारलं”; ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीला मिळाली होती वाईट वागणूक, म्हणाली…

सई लोकूरने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर पहिल्यांदाच लेकीबरोबरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देत सईने लिहिलं, “ताशीची पहिली आंतरराष्ट्रीय सहल सिंगापूर होती आणि म्हणून हा फोटो माझ्या इन्स्टाग्रामवर असावा असं मला वाटतं. तिने सुट्टीचा मनसोक्त आनंद लुटला. ती फ्लाइटमध्ये खूप आरामात होती आणि प्रवासात ती अर्धावेळ झोपली होती. सिंगापूर व्हीलचेअर आणि स्ट्रोलर फ्रेंडली असल्यामुळे सिंगापूरमध्ये तिच्यासोबत फिरणे खूप सोपे होते.”

सईने पुढे लिहिलं, “जवळजवळ सर्व ठिकाणी नर्सिंग रूम होत्या, जिथे मी तिचे कपडे सहज बदलू शकत होते आणि तिला खायला देऊ शकत होते. तिला प्रवासात मजा आली. तिला तिच्या आजूबाजूच्या सर्व गोष्टी पाहण्याची आणि नवीन गोष्टी शोधण्याची खूप उत्सुकता होती. ती एकदाही रडली नाही किंवा दररोज इतके तास बाहेर असल्यामुळे कंटाळलीपण नाही. तिला हवं तेव्हा ती एखाद्या चांगल्या मुलीसारखी तिच्या स्ट्रोलरमध्ये झोपायची आणि इतर वेळी, आम्ही भेट दिलेल्या सुंदर ठिकाणांचा तिने मनभरून आनंद घेतला. त्यामुळे एकंदरीतच ही एक उत्तम सहल होती आणि ती नेहमी लक्षात राहील.”

हेही वाचा… “गर्भाशय नाही तर…”, दीपिका पदुकोणला ट्रोल करणाऱ्यांना रिचा चड्ढा स्पष्टच म्हणाली…

दरम्यान, सईच्या कामाबद्दल सांगायचे झालं तर सईने मराठीसह हिंदी चित्रपटातदेखील काम केले आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वामुळे ती प्रसिद्धीझोतात आली. त्यानंतर सई ‘सनम हॉटलाइन’ या वेब सीरिजमध्ये झळकली होती. सध्या ती अभिनय क्षेत्रापासून दूर असून, वैयक्तिक आयुष्याचा आनंद घेतेय.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sai lokur shared photo with daughter tashi for the first time dvr