New Marathi Serial: सध्या मालिकांसाठी टीआरपी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट झाली आहे. त्यामुळे वाहिन्या सातत्याने नवनवीन प्रयोग करताना दिसत आहेत. आता बऱ्याच मालिका एक आणि दीड तास प्रसारित होतं आहेत. तसंच दुसऱ्या बाजूला नव्या मालिकांचं सत्र सुरुच आहे. लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे; ज्याचा नुकताच जबरदस्त प्रोमो समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘सखा माझा पांडुरंग’ ( Sakha Maza Pandurang )असं नव्या मालिकेचं नाव आहे. या मालिकेत संत सखूची अवीट भक्तीगाथा पाहायला मिळणार आहे. नुकताच या नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. प्रोमोच्या सुरुवातीला “पांडुरंग हरी” असा जयघोष करताना वारकरी दिसत आहेत. सर्वजण विठ्ठू माऊलीला नैवेद्य दाखवण्यासाठी थांबलेले पाहायला मिळत आहे. तेव्हा लवकरच महाप्रसाद दाखवण्यास सांगितलं जातं. यावेळी भटजी सखुचा नैवेद्य येऊ दे असं म्हणतात.

तितक्यात छोट्या सखुची एन्ट्री होते. ती शिऱ्याचा नैवेद्य घेऊन येते आणि विठ्ठलाला म्हणते, “भूक लागली असेल ना खाऊ घे.” मग सखुच्या नैवेद्यामध्ये चाफ्याचं फुल पडतं. असा सुंदर प्रोमो ‘सखा माझा पांडुरंग’ ( Sakha Maza Pandurang ) मालिकेचा आहे.

‘सन मराठी’ वाहिनीवरील या नव्या मालिकेत सखुची भूमिका बालकलाकार स्वराली खोमणेने साकारली आहे. तसंच विठ्ठलाच्या भूमिकेत ‘शिवा’ मालिकेतील अभिनेता तेजस महाजन पाहायला मिळणार आहे. याशिवाय अभिनेते सुनील तावडे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

कधीपासून मालिका सुरू होणार?

‘सखा माझा पांडुरंग’ ( Sakha Maza Pandurang ) ही नवी मालिका १० मार्चपासून ‘सन मराठी’ वाहिनीवर सोमवार ते रविवार पाहायला मिळणार आहे. सायंकाळी ७.३० वाजता ही नवी मालिका प्रसारित होणार आहे. सध्या यावेळेत ‘नवी जन्मेन मी…’ मालिका प्रसारित होत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sakha maza pandurang new serial coming soon on sun marathi pps