Samay Raina KBC Video: ‘कौन बनेगा करोडपती’ हा टीव्हीवरील लोकप्रिय क्विझ शो आहे. या शोच्या प्रत्येक पर्वात अनेक लोक येतात, प्रश्नांची उत्तरं देतात आणि पैसे जिंकतात. या शोने अनेकांची स्वप्ने पूर्ण केली. या शोच्या ताज्या भागामध्ये यूट्यूबर्स, सोशल मीडिया सेन्सेशन्स आणि कंटेंट क्रिएटर्स हजेरी लावणार आहे. शोचे काही प्रोमो समोर आले आहेत, ज्यात हे क्रिएटर्स अमिताभ बच्चन यांच्याशी गप्पा मारताना दिसतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘कौन बनेगा करोडपती’च्या आज शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या भागात कॉमेडियन समय रैना, तन्मय भट्ट, भुवन बाम आणि काम्या जानी पाहुणे म्हणून येणार आहेत. या शोचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये कॉमेडियन समय रैना आपल्या मजेशीर स्टाइलमध्ये अमिताभ बच्चन यांच्याशी मस्करी करताना दिसतो.

समय रैना हॉट सीटवर बसल्यावर अमिताभ बच्चन यांच्या ‘सूर्यवंशम’ या चित्रपटाबद्दल बोलताना दिसला. इतकंच नाही तर याचदरम्यान बिग बींनी असं काही म्हटलं की समयने लगेचच संपत्तीत हिस्सा मागितला.

‘इंडियाज गॉट लेटेंट’ या रोस्ट शोसाठी प्रसिद्ध असलेल्या समय रैनाने या शोमध्ये बिग बींच्या ‘सूर्यवंशम’ या आयकॉनिक चित्रपटाचा उल्लेख केला. समय बिग बींना म्हणाला, “मी तुमचा पहिला चित्रपट पाहिला होता, तो ‘सूर्यवंशम’ होता. दुसराही ‘सूर्यवंशम’ होता आणि तिसराही ‘सूर्यवंशम’ होता. कारण सेट मॅक्सवर पुन्हा पुन्हा तोच चित्रपट प्रसारित व्हायचा.” समय त्यातील विषारी खीरबद्दल म्हणाला, काल तुम्हाला खीरमध्ये विष असल्याचं कळलं होतं, मग आज पुन्हा खीर का खाल्ली? हे ऐकून खुद्द बिग बींनाही हसू आवरलं नाही.

पाहा प्रोमो

समय तन्मय भट्टबरोबर हॉट सीटवर बसला होता. तर भुवन आणि काम्या प्रेक्षकांमध्ये बसले होते. यावेळी समय अमिताभ यांना ‘शहेनशाह’मधला त्यांचा डायलॉग बोलायला लावतो. अमिताभ बच्चन ‘रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है शहेनशाह’ असं म्हणतात. यानंतर लगेच समय म्हणतो, “तुम्ही मला मुलगा म्हटलंच आहे तर संपत्तीत थोडा हिस्सादेखील द्या.” हे ऐकून अमिताभ पुन्हा हसू लागतात. तुम्हाला ‘कौन बनेगा करोडपती’चा हा मजेशीर एपिसोड आज सोनी टीव्हीवर पाहता येईल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samay raina asks amitabh bachchan for property mein hissa kaun banega crorepati video viral hrc