अभिनेत्री तितिक्षा तावडे हे नाव मराठी मालिका, चित्रपट विश्वातलीत सर्वांना परिचयाचं नाव आहे. नुकतीच ती क्रिकेटर मिताली राजच्या जीवनावर आधारित ‘शाब्बाश मिथू’ चित्रपटातही झळकली होती. सध्या ती सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतून आपल्या भेटीस येत आहे. तितिक्षा सोशल मीडियावरदेखील सक्रीय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहते असते. मालिकेच्या सेटवरील गंमतीजमती सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकतीच तिने मराठमोळ्या अभिनेत्याबद्दल पोस्ट शेअर केली आहे. ‘तू अशी जवळी राहा’ मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता सिद्धार्थ बोडकेबद्दल तितिक्षाने पोस्ट शेअर केली आहे. सिद्धार्थ बोडके नुकताच ‘दृश्यम २’ चित्रपटात दिसला आहे. या चित्रपटात तो बॉलिवूडमधील अजय देवगण, तब्बू यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांबरोबर झळकला आहे.

WORLD MENS DAY : “खंबीर पुरुष कधी…”; बिग बॉस फेम स्नेहलता वसईकरच्या पोस्टने वेधलं लक्ष

तितिक्षाने पोस्टमध्ये लिहलं आहे मी तुला यासाठी कठोर परिश्रम करताना पाहिले आहे! तू केलेल्या प्रत्येक प्रयत्नाचे मोल आहे! तू चमकलास! मला तुझ्या सर्वात लहान कामगिरीचा नेहमीच अभिमान वाटतो आणि हे खूप मोठे आहे माझ्यावर विश्वास ठेवा की हे खूप मोठे आहे, मला कळत नाही नक्की यावर कशी प्रतिक्रिया द्यावी! बरं, सध्या तरी मी तुझे मनापासून कौतुक करत आहे.

सिद्धार्थ बोडके मराठी चित्रपटातंही काम केलं आहे. ‘भय’, ‘नेबर्स’ या चित्रपटासंह व्हायरल जोडी या वेब सीरिजमध्येही सिद्धार्थ झळकला होता. दृश्यम २ हा त्याचा पहिलावहिला हिंदी चित्रपट यासाठी त्याचे चाहते त्याचे कौतूक होत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Serial actress titeeksha tawde appreciate marathi actor siddharth bodke who is in drushyam 2 spg