टीव्ही अभिनेता शालिन भानोत हा ‘बिग बॉस’मुळे गेले काही महिने चर्चेत होता. तो ‘बिग बॉस १६’ च्या टॉप ५ स्पर्धकांपैकी एक होता. पण, त्याला ट्रॉफी जिंकता आली नव्हती. बिग बॉसच्या घरात स्पर्धक टीना दत्ताबरोबरच्या नात्यामुळे शालिन चांगलाच चर्चेत राहिला होता. शालिनचा घटस्फोट झालेला असून त्याची पूर्वाश्रमीची पत्नी दलजीत कौर दुसरं लग्न करणार आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर आपल्याला याबद्दल कोणतीही माहिती नसल्याचं तो म्हणाला होता. त्यानंतर आता त्याने दलजीतच्या लग्नाबदद्ल प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उद्धव ठाकरेंनी शिवसेना गमावली अन् कंगना रणौतचं ‘ते’ जुनं ट्वीट व्हायरल; अभिनेत्री नव्याने शेअर करत म्हणाली…

शालिन बिग बॉसच्या घरात असताना दलजीतने तिच्या दुसऱ्या लग्नाची घोषणा केली होती. ती उद्योगपती निखिल पटेलबरोबर मार्चमध्ये लग्न करणार आहे. यावर ETimes शी बोलताना शालिन म्हणाला, “मी अजून तिला भेटलो नाहीये, मला तिला भेटायचं आहे आणि तिच्याशी बोलायचं आहे. मी तिच्यासाठी खूप आनंदी आहे. देव तिला आशीर्वाद देवो आणि तिला आनंद मिळो. लोकांनी मूव्ह ऑन करणं, आयुष्यात पुढे जाणं सामान्य आहे. खरं तर लोकांनी आयुष्याला आणखी एक संधी दिली पाहिजे. यासाठी काही अॅडजस्टमेंट कराव्या लागतात, पण ते ठीक आहे.”

Video: पहिल्या पतीने मसाबा गुप्ताशी लग्न केल्यानंतर अदिती राव हैदरीही ‘या’ अभिनेत्याच्या प्रेमात? थेट प्रश्न विचारताच अभिनेत्री म्हणाली…

दलजीतने काही दिवसांपूर्वी तिच्या इंस्टाग्रामवर ती प्रेमाला दुसरी संधी देत असल्याची घोषणा केली होती. तिने निखिलसोबतचा एक सुंदर फोटो पोस्ट करत मार्चमध्ये लग्न करून ती केनियाला जाणार असल्याचंही सांगितलं होतं. दरम्यान, दलजीत आणि शालिन यांचे २००९ मध्ये लग्न झाले होते, पण २०१५ मध्ये ते वेगळे झाले. त्यांना जेडन भानोत नावाचा मुलगा आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shalin bhanot reaction on ex wife dalljiet kaur wedding with nikhil patel hrc