रॅपर एमसी स्टॅनचा मुंबईतील कॉन्सर्ट चांगलाच चर्चेत आहे. या कॉन्सर्टच्या तिकीटांची किंमत, कॉन्सर्टला चाहत्यांची झालेली गर्दी हे प्रामुख्याने चर्चेतील विषय आहेतच, पण आणखी एका गोष्टीची सर्वाधिक चर्चा आहे, ती म्हणजे शिव ठाकरे. एमसी स्टॅन ‘बिग बॉस १६’ चा विजेता होता, तर शिव ठाकरे उपविजेता होता. स्टॅन आणि शिव दोघेही खूप चांगले मित्र आहेत. त्यामुळे मित्र स्टॅनच्या कॉन्सर्टला शिवदेखील पोहोचला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

MC Stan च्या कॉन्सर्टमध्ये शिव ठाकरेचीच हवा; सुंबूलबरोबर केला जबरदस्त डान्स, Video पाहिलात का?

स्टॅनच्या कॉन्सर्टला पोहोचलेल्या शिवबरोबर सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांनी गराडा घातला होता. त्याच्या गाडीजवळही चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. कॉन्सर्ट एमसी स्टॅनचा होता, पण चाहते शिव ठाकरेच्या नावाने ओरडत होते. त्यामुळे या कॉन्सर्टमध्ये स्टॅनच्या रॅप इतकाच शिव ठाकरेही भाव खाऊन गेला आहे. शिवने या कॉन्सर्टमधील काही फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत, त्यावरून त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज आपल्याला लावता येतो.

एमसी स्टॅनच्या मुंबईमधील कॉन्सर्टला जमली हजारोंची गर्दी, एका तिकिटाची किंमत होती तब्बल…

“सदैव कृतज्ञ आहे. मुंबईतील ब्लॉकबस्टर शोसाठी भाऊ स्टॅन तुझे खूप अभिनंदन” असं कॅप्शन देत शिवने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये चाहते शिवबरोबर सेल्फी घेण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत.

दरम्यान, बिग बॉसचा विजेता बनू शकला नसला, तरी शिव ठाकरे प्रचंड लोकप्रिय झाला आहे. त्याच्या फॉलोअर्सची संख्या सातत्याने वाढत आहे. त्याच्याबरोबर एक सेल्फी मिळवण्यासाठी चाहते गर्दी करताना दिसतात.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv thakare shares crowd video from mc stan mumbai concert say always grateful hrc