scorecardresearch

MC Stan च्या कॉन्सर्टमध्ये शिव ठाकरेचीच हवा; सुंबूलबरोबर केला जबरदस्त डान्स, Video पाहिलात का?

एका व्हायरल व्हिडीओमध्ये शिव व सुंबूल स्टॅनच्या रॅप साँगवर थिरकताना दिसत आहेत.

shiv thakare at mc stan concert
(फोटो – स्क्रीनशॉट्स

‘बिग बॉस १६’ चा विजेता रॅपर एमसी स्टॅन सध्या त्याच्या कॉन्सर्टमुळे चर्चेत आहे. रविवारी मुंबईमध्ये स्टॅनचा कॉन्सर्ट झाला, याठिकाणी चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. पुण्यानंतर आता मुंबईतही स्टॅनचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आले होते. या कॉन्सर्टला शिव ठाकरे, सुंबूल तौकीर खान व निमृत कौर अहलुवालिया यांनीही हजेरी लावली.

“तू अमानुष आहेस” नवाजुद्दीन सिद्दीकीच्या मुलांचा रस्त्यावरील व्हिडीओ पाहून संतापला अभिनेता; म्हणाला, “जर तुझी मुलं…”

कॉन्सर्ट एमसी स्टॅनचा होता, पण सोशल मीडियावर मराठमोळ्या शिव ठाकरेचीच हवा पाहायला मिळत आहे. त्याचे कॉन्सर्टमधील काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये शिव ठाकरे डान्स करताना दिसत आहे. एका व्हायरल व्हिडीओमध्ये शिव व सुंबूल स्टॅनच्या रॅप साँगवर थिरकताना दिसत आहेत. हा व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे.

‘बस्ती का हस्ती’ एमसी स्टॅन सध्या भारत दौऱ्यावर आहेत. ३ मार्चपासून त्याचे कॉन्सर्ट सुरू झाले आहेत. त्याचा अखेरचा शो ७ मे २०२३ रोजी होणार आहे. त्याने सर्वात पहिला कॉन्सर्ड पुण्यात आणि नंतर दुसरा कॉन्सर्ट मुंबईत केला. ५ मार्चला रविवारी झालेल्या या कॉन्सर्टमध्ये एमसी स्टॅनसह त्याच्या चाहत्यांनी खूप मस्ती केली.

एमसी स्टॅनच्या शोची आणि त्याच्या मित्रांच्या डान्सची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. स्टॅनच्या शोसाठी चाहते तुफान गर्दीही करत आहेत. देशभरात ७ मे पर्यंत अनेक ठिकाणी स्टॅनचे शो होणार आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-03-2023 at 07:47 IST