Maharashtrachi Hasya Jatra Fame Shivali Parab : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे अभिनेत्री शिवाली परब घराघरांत लोकप्रिय झाली. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. या कार्यक्रमामुळे असंख्य प्रेक्षक तिला ‘कल्याणची चुलबुली’ या नावाने देखील ओळखतात. शिवाली सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नेटकऱ्यांनी यावर असंख्य कमेंट्स केल्या आहेत. ही पोस्ट नेमकी काय आहे जाणून घेऊयात…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबने ( Shivali Parab ) बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनच्या गाण्यावर एक खास व्हिडीओ बनवला आहे. ‘कोई मिल गया’ चित्रपटातील ‘इधर चला मैं उधर चला’ या गाण्यातील एका कडव्यावर शिवालीने खास व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडीओत अभिनेत्रीला श्रमेश बेटकरने साथ दिली आहे. या व्हिडीओला श्रमेशने “तुम इतने भोले हो किसलिए?” अशी गाण्यातील एक ओळ कॅप्शनमध्ये लिहिली आहे. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.

हेही वाचा : Video : …अन् सगळे सदस्य ढसाढसा रडले! ‘बिग बॉस’च्या घरात भावनिक संवाद; नेटकरी म्हणाले, “सूरजला पाहून खूप…”

शिवालीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

शिवाली ( Shivali Parab ) आणि श्रमेश यांच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. “शिवाली हे खरंय…”, “हे ठीक नाही शिवाली”, “एक नंबर जोडी आहे”, “मग पक्क समजायचं का…”, “जोडी नंबर १”, “मनातल्या भावना ओठांवर…” अशा कमेंट्स चाहत्यांनी अभिनेत्रीच्या व्हिडीओवर केल्या आहेत.

हेही वाचा : “एवढं यश पाहिल्यावर जमिनीवर कसं राहावं…”, राज ठाकरेंनी केलं भरत जाधव यांचं कौतुक! ‘सही रे सही’ नाटकाबद्दल म्हणाले…

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परब ( फोटो सौजन्य : Shivali Parab )

हेही वाचा : हुबेहुब राज ठाकरे, तेजस्विनी पंडित अन् शूटिंगचा सेट; अभिनेत्री आणणार मनसे प्रमुखांवर चित्रपट? ‘तो’ फोटो व्हायरल

दरम्यान, शिवाली परबच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेत्रीने नुकतंच आपलं हक्काचं घर खरेदी केलं आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाशिवाय अनेक म्युझिकल व्हिडीओमधून शिवाली प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत शिवालीला सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चांबाबत विचारण्यात आलं होतं. यावर अभिनेत्रीने “फोटोंवर येणाऱ्या कमेंट्स वगैरे या सगळ्या केवळ चर्चा असून प्रत्यक्षात असं काहीच नाहीये” असं स्पष्ट केलं होतं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivali parab shared video with maharashtrachi hasya jatra fame shramesh betkar netizens reacted sva 00