Shubhvivah Fame Actress Announced Pregnancy : ‘शुभविवाह’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. त्यामध्ये अनेक लोकप्रिय कलाकार महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना पाहायला मिळत आहेत. अशातच त्यातील लोकप्रिय अभिनेत्री लवकरच आई होणार असल्याची आनंदाची बातमी समोर आली आहे.
‘शुभविवाह’ मालिकेत अभिनेता यशोमान आपटे, मधुरा देशपांडे, कुजिंका काळविंट यांसारखे इतर काही लोकप्रिय कलाकार महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहेत. अशातच या मालिकेत पूर्णिमा ही भूमिका साकारणारी अभिनेत्री लवकरच आई होणार आहे. ‘राजश्री मराठी’ने यासंबंधीत पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
‘शुभविवाह’ फेम कुंजिका काळविंट लवकरच होणार आई
पूर्णिमा म्हणजे अभिनेत्री कुंजिका काळविंट खऱ्या आयुष्यात लवकरच आई होणार असून, नुकताच तिच्या डोहाळजेवणाचा कार्यक्रम पार पडला आहे. डोहाळजेवणाच्या कार्यक्रमाला अभिनेत्रीसह तिचा नवरा निखिल काळविंटही उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं. त्यावेळी अभिनेत्रीनं हिरव्या रंगाची साडी नेसली असून, डोहाळजेवणासाठी ती छान पारंपरिक अंदाजात तयार झाल्याचं समोर आलेल्या फोटो व व्हिडीओंमधून पाहायला मिळतं.
कुंजिकाबद्दल बोलायचं झालं, तर तिच्या व निखिल काळविंट यांच्या लग्नाला १० वर्षं पूर्ण झाली आहेत. याबद्दल अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट करीत सांगितलेलं. लग्नाच्या १० वर्षांनंतर या जोडीनं आई-बाबा होण्याचा निर्णय घेतला असून, आता लवकरच त्यांच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. कुंजिका अनेकदा तिच्या नवऱ्याबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असते.
कुंजिका ‘स्टार प्रवाह’वरील ‘शुभविवाह’ मालिकेत महत्तवपूर्ण भूमिका साकारायची. त्यासह ती सोशल मीडियावरही सक्रिय असून अनेकदा सेटवरील गमती जमती, तसेच कामासंदर्भातील अपडेट ती चाहत्यांसह शेअर करीत असते. अनेकदा ती मालिकेतील सहकलाकारांबरोबर रील बनवून सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसते.
‘शुभविवाह’ ही मालिका जानेवारील २०२३ रोजी सुरू झालेली. त्यामधून अभिनेत्रीनं गेली दोन वर्षं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. यामध्ये तिनं अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या ऑनस्क्रीन सुनेची भूमिका साकारलेली. त्यादरम्यान दोघी अनेकदा एकमेकींबरोबरचे रील, डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसल्या. कुंजिका या मालिकेपूर्वी ‘ती परत आलीये’ या मालिकेत झळकलेली.