Smita Shewale Talks About Son Kabir : स्मिता शेवाळे मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवर तिने मालिका, चित्रपटांत काम केलं आहे. अलीकडेच ती ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटातून झळकली होती. सध्या ती तिच्या आगामी चित्रपटाच्या तयारीत व्यग्र आहे. स्मिता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिच्या मुलाबरोबरचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.
स्मिताने नुकतच एका मुलाखतीत तिच्या मुलाबरोबरच्या नात्याबद्दल सांगितलं आहे. स्मिताचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झालेला. त्यानंतर अभिनेत्री एकटीने तिच्या मुलाचा सांभाळ करत असून त्याच्यासाठी तिने तिची ‘मुरांबा’ ही मालिकादेखील सोडल्याचं तिच्या ब्लॉगमधून सांगितलेलं. अशातच आता तिने ‘सकाळ’ला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितलं आहे.
स्मिता शेवाळेची मुलाबद्दल प्रतिक्रिया
मुलाखतीत स्मिता मुलाविषयी म्हणाली, “कबीर माझं विश्व आहे, सध्या तो लहान असल्याने त्याला मी हवी आहे, पण खरं सांगायचं तर मला तो जास्त हवाय, त्यामुळे मला त्याची खूप गरज आहे. मला असं वाटतं, मी आई झाली आहे तर मला पूर्णपणे आईपण अनुभवता आलं पाहिजे. कारण थोडा मोठा झाल्यानंतर त्याचं एक स्वत:चं वेगळं आयुष्य सुरू होईल, तोपर्यंत तरी त्याला आई हवी आहे आणि मलाही तो हवा आहे.”
मुलाबद्दल स्मिता पुढे म्हणाली, “तो माझ्याशी इतकं काही बोलतो की मला त्यातून खूप ऊर्जा मिळते. मला आठवतंय ‘सुभेदार’ चित्रपट मिळाला तेव्हा मी त्याच्यासमोर स्क्रिप्ट वाचत होते, तेव्हा तो मला हा तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा रोल आहे आई, सगळं छान कर असं म्हणालेला. तेव्हा तो फक्त चार वर्षांचा होता. पण, लहान वयात तो खूप छान बोलायचा.”
स्मिताला पुढे एकल पालकत्वाबद्दल विचारल्यानंतर ती म्हणाली, “तो खूप समजूतदार आहे. त्याला माहिती आहे की त्याच्यासाठी आईने वेळ काढला आहे. त्याच्यासाठी तिच्या करिअरमधील काही गोष्टींचा त्याग केला आहे, त्यामुळे त्याला ती जाणीव असेल असं मला वाटतं; पण तो मला खूप प्रोत्साहन देत असतो.