केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि जुबिन इराणी यांची लाडकी लेक शनेल इराणी अखेर विवाहबंधनात अडकली. तिने तिचा बॉयफ्रेंड अर्जुन भल्लाबरोबर लग्नगाठ बांधली. राजस्थानमधील नागौर येथील ५०० वर्षे जुन्या खींवसर किल्ल्यावर त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला आहे. आता शनेल आणि अर्जुनच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शनेल आणि अर्जुनचा लग्नसोहळा ७ ते ९ फेब्रुवारीदरम्यान आयोजित करण्यात आला होता. या शाही विवाहसोहळ्याचे अनेक फोटो सध्या व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोत इराणी आणि भल्ला कुटुंबिय यांची मजामस्ती पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या लग्नसोहळ्याद्वारे राजस्थानमधील संस्कृतीचे दर्शनही होत आहे.
आणखी वाचा : स्मृती इराणींची लेक बॉयफ्रेंडने प्रपोज केलेल्या किल्ल्यात करणार लग्न; ५०० वर्षे जुन्या किल्ल्याचे फोटो अन् एका दिवसाचं भाडं ऐकून व्हाल थक्क

लेकीच्या लग्नासाठी स्मृती इराणी यांनी लाल रंग आणि गोल्डन बॉर्डर असलेली साडी परिधान केली होती. त्यांची लेक शनेलने लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता. तर स्मृती इराणींच्या जावयाने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने राजस्थानच्या खींवसर किल्ला हा विविध रंगेबेरंगी फुलांनी सजवण्यात आला होता. त्याबरोबर आकर्षक रोषणाईदेखील करण्यात आली होती.

शनेल आणि अर्जुन यांनी लग्नासाठी राजस्थानची संस्कृती अशी थीम ठरवली होती. त्यामुळे त्यांच्या लग्नसोहळ्यात राजस्थानी पदार्थांची मेजवानी पाहायला मिळाली. या दोघांनीही थीमला साजेसे राजस्थानी पद्धतीचे कपडे परिधान केले होते. ते दोघेही यावेळी खूपच आनंदात पाहायला मिळत आहेत. दरम्यान २०२१ मध्ये शनैल आणि अर्जुनचा साखरपुडा पार पडला होता. स्मृती इराणी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन फोटो शेअर करत ही माहिती दिली होती.

रिसेप्शनसाठी खास जागेची निवड

शनेल आणि अर्जुनने लग्नाप्रमाणे रिसेप्शनसाठीदेखील एका खास जागेची निवड केली आहे. त्या दोघांचे रिसेप्शन एका आलिशान रिसॉर्ट होणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र अद्याप ते ठिकाण कोणतं असेल याची माहिती समोर आलेली नाही.

आणखी वाचा : “आम्ही दोघंही…” स्नेहल शिदमबरोबरच्या ‘त्या’ फोटोवर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेची पहिली प्रतिक्रिया

स्मृती इराणी यांचा जावई कोण आहे?

स्मृती इराणी यांचा जावई अर्जुन भल्लाचा जन्म जन्म कॅनडातील टोरंटो येथे झाला आहे. त्याचे शालेय शिक्षण कॅनडातील सेन्ट रॉबर्ट कॅथोलिक हायस्कूलमध्ये झालं आहे. त्यानंतर त्याने लिसेस्टर विद्यापीठातून एलएलबी केलं. २०१४ साली त्याने कॅनडामध्ये अकाऊंट मॅनेजर म्हणून काम केलं आहे. सध्या अर्जुन लंडनमध्ये एमबीएचं (MBA) शिक्षण घेत आहे. अर्जुन त्याच्या कामामुळे ‘अ‍ॅपल’ या कंपनीशीही जोडला गेला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smriti irani daughter shanelle irani arjun bhalla wedding in rajasthan see first photos nrp