केंद्रात मंत्री असलेल्या भाजपा नेत्या स्मृती इराणी एकेकाळी टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेने त्यांना खूप लोकप्रियता मिळवून दिली होती. यात त्यांनी तुलसी नावाच्या सूनेची भूमिका केली होती. या मालिकेची ऑफर का स्वीकारली होती, याबाबत स्मृती इराणींनी भाष्य केले आहे. तसेच आपण लग्नाच्या दिवशीही शोचे शुटिंग केल्याची आठवण त्यांना सांगितली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“गार्गी माझा आरसा आहे”, नागराज मंजुळेंचे पत्नीबद्दल विधान; पहिली भेट कुठे झाली होती? म्हणाले, “आम्ही…”

‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ साठी का होकार दिला याबद्दल स्मृती इराणी यांनी खुलासा केला आहे. ‘ऑल अबाउट इव्ह इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या की मी गरिबी पाहिली आहे. त्यामुळे मी एक दिवसही काम बंद करू शकत नव्हते. “मी गरीब होते. जर तुम्ही गरीब असाल, तर तुम्ही काम करण्याची प्रत्येक संधी घ्याल आणि गरीब माणूस कधीही पैसे कमविण्यास मदत करणारी कोणतीही संधी सोडणार नाही,” असं त्या म्हणाल्या.

आपण लग्नाच्या दिवशीही शोचे शूटिंग केले होते असा खुलासा स्मृतींनी केला आहे. तसेच पहिल्या मुलाला जन्म दिल्यानंतर लगेच सेटवर परत जायचे, कारण पैशांची गरज होती, असंही त्या म्हणाल्या. “माझ्यासारख्या एखाद्याला रोजची मजुरी सोडायला सांगितल्यास त्याला हृदयविकाराचा झटका येईल. गरिबीमुळे दबाव निर्माण होतो आणि मी ठरवलं होतं की मी माझ्यावर तो दबाव पडू देणार नाही”, असं स्मृतींनी सांगितलं.

नाना पाटेकरांनी सेल्फी काढायला आलेल्या चाहत्याच्या डोक्यावर जोरात मारला फटका, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, एकदा गर्भपात झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी शुटिंगसाठी जावं लागलं होतं, असं त्यांनी सांगितलं होतं. गर्भपात झाल्याचं कळवण्यासाठी एकता कपूरला फोन केला तेव्हा तिने दुसऱ्या दिवशी शुटिंगला यायला सांगितलं. कारण मी गर्भपात झाल्याचं खोटं कारण देत असल्याचं तिला एका कलाकाराने सांगितलं होतं, असं त्या म्हणाल्या होत्या.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smriti irani reveals she did shoot kyunki saas bhi kabhi bahu thi after 3 days of delivery hrc