Tu He Re Maza Mitwa upcoming twist: ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेत ट्विस्ट सतत काही ना काही नवीन घडताना दिसते. मालिकेत नवनवीन ट्विस्ट येताना पाहायला मिळतात. त्यामुळे मालिकेत पुढे काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. ईश्वरी व अर्णवच्या आयुष्यात नेमके काय घडणार हे जाणून घेण्याची चाहत्यांना आतुरता असते.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, काही दिवसांपूर्वी ईश्वरी व अर्णवचे लग्न झाले आहे. पण, हे लग्न ईश्वरीच्या मनाविरुद्ध झाले आहे. राकेशमुळे ईश्वरीच्या मनात अर्णवबद्दल अनेक गैरसमज आहेत. राकेशने अर्णवची गाडी घेऊन ईश्वरीच्या वडिलांचा अपघात घडवून आणला. गाडी कोण चालवत होतं हे न बघितल्यामुळे आणि गाडी अर्णवची असल्याने ईश्वरीचा गैरसमज झाला की तिच्या वडिलांचा अपघात अर्णवने घडवून आणला आहे.
आता ईश्वरीच्यासमोर राकेशचे सत्य आले आहे. तो तिला फसवत असल्याचे सत्य ईश्वरीला समजले आहे. जो राकेश तिला लग्नाची मागणी घालत होता, तोच राकेश हा अर्णवच्या बहिणीचा नवरा राजेश आहे, हे समोर आल्यानंतर ईश्वरीला धक्का बसला आहे. आता या सगळ्यात ईश्वरी आणि अर्णव यांच्यातील गैरसमज दूर होत असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
“त्या राकेशने अंजलीताईंबरोबर काही वाईट…”
स्टार प्रवाह वाहिनीने तू ही रे माझा मितवा मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. प्रोमोमध्ये पाहायला मिळते की ईश्वरी व अर्णव एकमेकांशी बोलत आहेत. ईश्वरी अर्णवला भावुक होऊन विचारते की त्या राकेशने अंजलीताईंबरोबर काही वाईट… तिचे वाक्य पूर्ण होण्याअगोदरच अर्णव म्हणतो, “याच भीतीमुळे तुला खरं सांगायचं राहिलं.”
अर्णवचे बोलणे ऐकून ईश्वरी म्हणते,”म्हणून तुम्ही स्वत:चं आयुष्यही पणाला लावलं?”, त्यावर अर्णव म्हणतो, “कारण-तुझ्या आयुष्याची माती होऊ द्यायची नव्हती.” त्यावर ईश्वरी म्हणते, “इतकं? माझ्यासाठी?” तिचे हे प्रश्न ऐकून अर्णव म्हणतो, “तुला अजून खूप काही कळायचं बाकी आहे”, ईश्वरी पुढे म्हणते, “मी कोण होते तुमची?” तिचा प्रश्न ऐकल्यानंतर अर्णव काहीच बोलत नाही.
हा प्रोमो शेअर करताना स्टार प्रवाह वाहिनीने, “ईश्वरीला सांगू शकेला का अर्णव त्याच्या मनातील भावना…?”, अशी कॅप्शन दिली आहे.
नेटकरी काय म्हणाले?
हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकरी कमेंट्स करत कौतुकाचा वर्षाव करत आहेत. एका नेटकऱ्य़ाने लिहिले, “हा प्रोमो पाहण्यासाठी उत्सुक आहे. या मालिकेतील बहुतांश कलाकारांचे डोळे खूप सुंदर आहेत”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “वाह! आता खूप भारी वाटत आहे. ईश्वरीला त्या राकेशचं सत्य समजलं. अर्णव तिच्यावर तुझं प्रेम आहे, हे सांगून टाक”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “किती गोड”, एका नेटकऱ्याने लिहिले, “आता सांगून टाक अर्णव की तुझं ईश्वरीवर प्रेम आहे.” एका नेटकऱ्याने लिहिले, “अखेरीस, मिस इंदोरला अर्णवची किंमत समजली”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, आता मालिकेत पुढे नेमकं काय घडणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.