Swanandi Tikekar : नवीन वर्ष सुरू झाल्यापासून अनेक मराठी कलाकारांचं गृहस्वप्न साकार झाल्याचं पाहायला मिळालं. नुकताच अमृता खानविलकरने तिच्या नवीन घरात आपल्या कुटुंबीयांच्या साथीने गृहप्रवेश केल्याचं पाहायला मिळालं होतं. आता अमृता पाठोपाठ मनोरंजन विश्वातील आणखी एका अभिनेत्रीने प्रेक्षकांना आनंदाची बातमी दिली आहे. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेल्या स्वानंदी टिकेकरने नुकतंच नवीन घर खरेदी केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेमुळे अभिनेत्री स्वानंदी टिकेकर प्रसिद्धीझोतात आली. याशिवाय ‘झी मराठी’वरील ‘अगंबाई सुनबाई’ मालिकेत स्वानंदीने मुख्य भूमिका साकारली होती. स्वानंदी ही प्रसिद्ध अभिनेते उदय टिकेकर आणि शास्त्रीय संगीत गायिका आरती अंकलीकर यांची मुलगी आहे. अभिनय क्षेत्रात आपली ओळख निर्माण केल्यावर स्वानंदीने प्रसिद्ध गायक आशिष कुलकर्णीशी २५ डिसेंबर २०२३ रोजी पुण्यात लग्नगाठ बांधली.

स्वानंदी-आशिषची एकमेकांशी ओळख झाल्यावर अवघ्या ३ ते ४ महिन्यांत या दोघांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता. नव्या वर्षात या जोडप्याचं गृहस्वप्न साकार झालं आहे. नव्या घरातून पहिला फोटो शेअर करत स्वानंदीने आपल्या सर्व चाहत्यांना घर घेतल्याची आनंदाची बातमी दिली आहे.

नव्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ स्वानंदी आणि आशिषने सुंदर असं फोटोशूट केलं आहे. दुसऱ्या फोटोत दोघेही एकमेकांचं अभिनंदन करत असल्याचं पाहायला मिळत आहे. स्वानंदीने नवीन घर घेतल्याची आनंदाची बातमी शेअर करताच तिच्या चाहत्यांनी या जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. सखी गोखले, सुरुची अडारकर, सुकन्या मोने, अश्विनी कासार, कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर, शमिका भिडे या कलाकारांनी कमेंट्स करत स्वानंदीला नव्या घरासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, स्वानंदीचा पती आशिष कुलकर्णीबद्दल सांगायचं झालं, तर तो उत्तम गायक आणि गीतकार आहे. २०१५ मध्ये त्याने मित्रांसह ‘रॅगलॉजिक’ हा स्वत:चा संगीत बँड तयार केला. हार्ड रॉक कॅफे, हाय स्पिरिट्स, ब्लूफ्रॉग यांसारख्या अनेक लोकप्रिय म्युझिक बँडबरोबर त्याने काम केलं आहे. याशिवाय आशिष ‘इंडियन आयडॉल सीझन १२’ मध्ये सहभागी झाला होता.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swanandi tikekar and her husband ashish kulkarni buys new house shares photo sva 00