Tejashri Pradhan shares photo: तेजश्री प्रधान ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजपर्यंत तिने विविध मालिकांमध्ये साकारलेल्या विविध भूमिका गाजल्या आहेत. तिच्या भूमिकांना प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाल्याचे दिसले आहे.
सध्या तेजश्री प्रधान झी मराठी वाहिनीवरील वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेत प्रमुख भूमिकेत काम करत आहे. या मालिकेत तिने स्वानंदी ही भूमिका साकारली आहे. या भूमिकेला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळत असल्याचे वेळोवेळी पाहायला मिळते.
घरातील मोठी मुलगी, समजूतदार, बाबांची लाडकी, भावंडांवर प्रेम करणारी, आईची काळजी असणारी, संकटातून मार्ग काढत परिस्थितीला सामोरी जाणारी अशी स्वानंदी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. याच स्वानंदीला समर राजवाडे यांच्याशी लग्न करावे लागते. सध्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत स्वानंदी व समर आणि रोहन व अधिराच्या लग्नाचा ट्रॅक पाहायला मिळत आहे.
आता तेजश्रीने स्वानंदीच्या गेटअपमधील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये ती नववधूप्रमाणे सजली आहे. तिने गुलाबी रंगाचा शालू नेसला आहे. खांद्यावर हिरव्या रंगाचा शेला, कपाळाला मुंडावळ्या, हातात हिरव्या बांगड्या, हातावर मेंदी, गळ्यात दागिने अशा लूकमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.
हा फोटो शेअर करताना तेजश्रीने लिहिले, “परीकथा खूप सुंदर असू शकतात”, तसेच पुढे हार्ट इमोजी शेअर केली आहे. तेजश्रीच्या या फोटोवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे.
नेटकरी काय म्हणाले?
एका चाहत्याने लिहिले, “नवराई माझी”, दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, “पाहताना तुला चंद्रही लाजला”, असे लिहित पुढे हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत. आणखी एका चाहत्याने लिहिले, “तू नेहमीप्रमाणेच खूप सुंदर दिसत आहेस. प्रत्येक लूकमध्ये तू खूप सुंदर दिसतेस. तुझा लग्नानंतरचा लूक आणि मंगळसूत्राची डिझाईन पाहण्यासाठी उत्सुक आहे.”
एका नेटकऱ्याने लिहिले, “खूप सुंदर. स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी असू दे, तू माझी आवडती अभिनेत्री आहेस”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “सुंदरी”, अशा अनेक कमेंटस् पाहायला मिळत आहेत.
अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत. अनेक नेटकऱ्यांनी तेजश्रीचे कौतुक करत कमेंट्स केल्या आहेत. दरम्यान, आता वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेत आगामी काळात काय घडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
