Tejashri Pradhan Shares Photo: अभिनेत्री तेजश्री प्रधानने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ शेअर करत तिने नवीन वेब सीरिज, नवीन सुरुवात असे लिहिले होते.

आता व्हिडीओ शेअर करताना ती कोणत्या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय, याबद्दल काहीही लिहिले नव्हते. मात्र, अभिनेत्रीला एका नव्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. आता तेजश्रीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये तेजश्री निळ्या जिन्स आणि गुलाबी रंगाच्या शर्टमध्ये दिसत आहे. तसेच तिने केस बांधल्याचे दिसत आहे. तिच्या वेब सीरिजच्या शूटिंगला सुरुवात झाली असल्याचे तिच्या हातातील पाटीवरून समजत आहे. तेजश्री या फोटोमध्ये अत्यंत सुंदर दिसत आहे.

हे फोटो शेअर करताना तिने दियाला भेटा असे लिहिले आहे. याचाच अर्थ तिच्या भूमिकेचे नाव दिया असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच याबद्दलची माहिती लवकरच शेअर करेन असेही लिहिले आहे.

नेटकऱ्यांनी केल कौतुकाचा वर्षाव

आता तेजश्रीचे हे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेकांनी कमेंट्समध्ये हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत तर एकाने लिहिले, “या लूकमध्ये खूप सुंदर दिसत आहेस”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “सुंदर लूक”, एकाने विचारले की चित्रपट येणार आहे की मालिका?, आणखी एकाने लिहिले, “खूप सुंदर लूक आहे”, एकाने लिहिले, “काहीतरी नवीन येतंय, आतापासूनच उत्सुकता वाढली आहे”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

आता तेजश्री ज्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तो हिंदी आहे मराठी आहे, तिच्याबरोबर आणखी कोणते कलाकार त्यामध्ये दिसणार आहे, कथानक काय असणार आहे आणि असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.

सध्या तेजश्री प्रधान झी मराठी वाहिनीवरील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहे. या मालिकेत तिने स्वानंदी ही भूमिका साकारली आहे. या भूमिकेतून ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेत सध्या समर व स्वानंदीच्या लग्नाचा ट्रॅक पाहायला मिळत आहे. एकमेकांच्या विरुद्ध सवयी आणि स्वभाव असलेले समर स्वानंदी लग्नानंतर कसे एकत्र राहणार, काय गमती जमती घडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.