Tharala Tar Mag Monika Dabade Reveals Baby Girl Face : ‘ठरलं तर मग’ मालिकेत अर्जुनच्या सख्ख्या बहिणीची म्हणजेच अस्मिताची भूमिका अभिनेत्री मोनिका दबाडे साकारत आहे. सध्या अस्मिता गरोदर असल्याचा सीक्वेन्स मालिकेत सुरू आहे. मात्र, खऱ्या आयुष्यात मोनिकाने यावर्षी मार्च महिन्यात गोंडस मुलीला जन्म दिला. १५ मार्च २०२५ रोजी मोनिकाच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं; लाडक्या लेकीचं नाव मोनिकाने वृंदा असं ठेवलं आहे.
मोनिकाने यापूर्वी लेकीच्या बारशाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. मात्र, गेली ७ महिने अभिनेत्रीने एकाही फोटोमध्ये वृंदाचा फेस रिव्हिल केला नव्हता. काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये मोनिकाने दिवाळी पाडव्याला लेकीचा चेहरा रिव्हिल करणार असल्याचं चाहत्यांना सांगितलं होतं. यानुसार आज अभिनेत्रीने वृंदाचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
मोनिकाने शेअर केलेल्या फोटोमध्ये चिमुकली वृंदा खूपच क्युट दिसत आहे. या फोटोमध्ये वृंदाने हिरव्या अन् पिवळ्या रंगाचा ट्रे़डिशनल डिझाइन असलेला फ्रॉक घातल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, हा ड्रेस वृंदाला ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोनिकाच्या आईची भूमिका साकारणाऱ्या कल्पना म्हणजेच प्राजक्ता दिघे यांनी गिफ्ट दिला आहे.
वृंदाचा फोटो शेअर करत मोनिका लिहिते, “वृंदा, मोनिका आणि चिन्मयकडून सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! वृंदाचा ड्रेस प्राजक्ता दिघे म्हणजेच तिच्या आजीने भेट दिलाय.” नेटकऱ्यांनी या फोटोवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. वृंदा खूप क्युट आहे, बाबांसारखी वृंदा गोड मुलगी, फायनली वृंदाचा चेहरा दिसला…बाबासारखी दिसतेय अशा प्रतिक्रिया अभिनेत्रीच्या पोस्टवर आल्या आहेत.
मोनिकाचा नवरा काय करतो?
मोनिकाचा पती चिन्मय कुलकर्णीचं छोट्या पडद्याशी खास कनेक्शन आहे. टेलिव्हिजनवरच्या रिॲलिटी शोजचा स्टार लेखक म्हणून त्याला ओळखलं जातं. सध्या एका Stand Up कॉमेडी शोमध्ये तो सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. ‘स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव’, ‘स्टार प्रवाह ढिंच्यॅक दिवाळी २०२३’, ‘आता होऊ दे धिंगाणा’ या कार्यक्रमांचं लिखाण चिन्मय कुलकर्णीने केलेलं आहे. यासाठी वाहिनीने त्याचा सन्मान देखील केला होता.