Tharala Tar Mag Producers Soham Bandekar : आदेश व सुचित्रा बांदेकर यांच्याकडे कलाविश्वातील आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. त्यांच्या लेकाचं नाव सोहम बांदेकर असून ‘स्टार प्रवाह’च्या ‘ठरलं तर मग’ आणि ‘घरोघरी मातीच्या चुली’ या दोन आघाडीच्या मालिकांची निर्मिती सोहम प्रोडक्शनने केलेली आहे. काही वर्षांपूर्वीच सोहमने आपल्या आई-बाबांच्या पावलावर पाऊल टाकत कलाविश्वात पदार्पण केलं होतं.

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘नवे लक्ष्य’ या मालिकेतून सोहम छोट्या पडद्यावर झळकला. त्याबरोबरच सोहमने ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी सेशन’ घेतलं. यावेळी सोहमने त्याच्या चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना भन्नाट उत्तर दिली आहेत.

सोहमला इन्स्टाग्राम ‘आस्क मी सेशन’मध्ये त्याच्या एका चाहत्याने “एक अशी गोष्ट सांग… ज्याचा तुला खूप कंटाळा येतो” असा प्रश्न विचारला. यावर अभिनेत्याने “स्वत:ची काळजी घेण्याचा कंटाळा येतो” असं उत्तर दिलं.

याशिवाय “तुझे आवडते पदार्थ कोणते?” असा प्रश्न अभिनेत्याला विचारला असता त्याने “खेकडे, दही भात, रामेन” या पदार्थांची नावं सांगितली.

सोहमला यावेळी ‘आस्क मी सेशन’मध्ये एका चाहत्याचा हटके मेसेज आला होता. या चाहत्याने सोहमची निर्मिती असलेल्या ‘ठरलं तर मग’ मालिकेबद्दल त्याला खास विनंती घेतली आहे. “एक छोटीशी विनंती आहे…प्लीज प्रियाला अनावश्यक फुटेज देऊ नका आणि कृपया सायलीचं जरा चांगलं स्टायलिंग करा” यावर सोहमने, “अरे बापरे! ओके” असं उत्तर दिलं आहे. यावरून या मालिकेची किती क्रेझ आहे हे स्पष्ट होतं.

‘ठरलं तर मग’ मालिकेचा निर्माता ( Tharala Tar Mag Producers Soham Bandekar )

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेबद्दल सांगायचं झालं तर, गेली अडीच वर्षे ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. पहिल्या दिवसापासून ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी आणि अभिनेता अमित भानुशाली यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. दररोज रात्री ८.३० वाजता ही मालिका प्रसारित केली जाते. याशिवाय यंदा ‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळ्यात ‘ठरलं तर मग’ महाराष्ट्राची महामालिका ठरली होती.