Tharala Tar Mag Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत अर्जुनच्या मनात गैरसमज निर्माण झाल्यामुळे मैनावती व सदाशिव यांची सायलीचे आई-बाबा या नात्याने सुभेदारांच्या घरात एन्ट्री झालेली आहे. मात्र, मैना काकूंचं वागणं, चोरी करण्याची सवय, सतत पैशांवर डोळा ठेवणं या सगळ्या गोष्टी अर्जुनला खटकत असतात. सायली आणि तिच्या आई-बाबांच्या स्वभावात खूप फरक आहे हे अर्जुन ओळखतो. यामुळेच तो मायलेकींची DNA टेस्ट करण्याचा निर्णय घेतो.
खरंतर, सदाशिव व मैनावती हे सायलीचे नाहीतर प्रियाचे खरे आई-बाबा असतात. पण, किल्लेदारांच्या घरातील सुखसुविधा सोडून प्रियाला तिच्या गरीब आई-बाबांकडे पुन्हा जायचं नसतं. पण, प्रत्यक्षात प्रिया आणि मैनावती काकूंच्या सगळ्या सवयी अगदी सेम टू सेम मॅच होत असतात. अस्मिता सुद्धा “मैना काकू सायलीची कमी आणि प्रियाची आई जास्त वाटते” असं मत पूर्णा आजीसमोर व्यक्त करते…ही गोष्ट अर्जुन सुद्धा ऐकतो आणि त्याच्या मनात संशयाची चक्र सुरू होतात.
आता सायलीच्या मनात सुद्धा मैनावती व सदाशिव तिचे आई-बाबा नाहीत याबद्दल संशय निर्माण होणार आहे. नेमकं काय घडणार पाहुयात…
सदाशिव व मैनावती मंदिराकडे जाणूनबुजून भीक मागत असतात. इतक्यात सायली-अर्जुनची गाडी या परिसरात येऊन पोहोचते. आई-बाबांना असं भीक मागताना पाहिल्यावर सायलीला धक्का बसतो. ती पटकन त्यांची विचारपूस करायला पुढे येते आणि दोघांना गाडीत आणून बसवते.
घरी आल्यावर सायली अर्जुनसमोर आपलं मन मोकळं करते आणि म्हणते, “माझ्या आई-बाबांचं असं रस्त्यावर भीक मागणं मला अजिबात आवडलं नाही. का कुणास ठाऊक… मला सतत असं वाटतंय ते माझे खरे आई-बाबा नाहीयेत.”
यावर अर्जुन DNA रिपोर्ट्स मॅच झालेत असं सायलीला सांगतो. याचा अर्थ सायली व मैनावती यांचे रिपोर्ट्स पुन्हा एकदा खोटेपणा करून प्रियाने मुद्दाम मॅच करून घेतलेत हे स्पष्ट झालं आहे. पण, आता सायलीला सगळी कटकारस्थानं माहिती झाली आहेत.
त्यामुळे ती नवऱ्याला स्पष्ट सांगते, “ते DNA रिपोर्ट्स मॅच झालेत पण, ते चुकीचेही असू शकतात. माझं मन मला सांगतंय हे रिपोर्ट्स खोटे आहेत आणि ते दोघं माझे आई-बाबा नाहीयेत.”
दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेचा हा विशेष भाग ३१ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर असे दोन दिवस प्रसारित केला जाईल. आता सायली तिच्या आई-बाबांचं सत्य कसं शोधून काढणार आणि प्रियाचा हा नवीन खोटेपणा उघड होणार की नाही हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
